Head linesMaharashtraPachhim MaharashtraSangali

खासदार संजयकाकांच्या पॅनलचा पराभव, राष्ट्रवादीची सत्ता कायम; आमदार पडळकरानी कांनशिलात मारल्याने आटपाडीत तणाव!

सांगली (संकेतराज बने) – तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे खासदार संजयकाका पॅनेलचा पराभव करीत, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली आहे. रविवारी तासगाव व आटपाडी बाजार समितीसाठी चुरशीने मतदान झाले. आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पॅनेलच्या एका ग्रामपंचायत सदस्याला कानशिलात लगावल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात राखली.

खा. पाटील यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चुरशीने ९७ टक्के मतदान झाले, तर आटपाडीमध्ये ९७.११ टक्के मतदान झाले. तासगावमध्ये भाजपाने काँग्रेससोबत केलेल्या पॅनेल विरुद्ध राष्ट्रवादी आणि आटपाडीमध्ये भाजपा-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट- काँग्रेस-रासप अशी लढत झाली. तासगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने १८ पैकी १४ जागा जिंकून सत्ता कायम राखली असली तरी, खा. पाटील यांच्या पॅनेलने चार जागा जिंकून बाजार समितीमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील हेही विरोधी पॅनेलमधून विजयी झाले. आटपाडी बाजार समितीसाठी भाजपाने राष्ट्रवादीशी आघाडी केली होती, तर विरोधी पॅनेलमध्ये शिवसेना शिंदे गट, रासप आणि काँग्रेस यांचे संयुक्त पॅनेल मैदानात होते. या बाजार समितीसाठी सुमारे ९७.११ टक्के मतदान झाले. मतदानावेळी काळेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांना आ. पडळकर यांनी कानशिलात मारल्याचा आरोप केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मतदारांना आवाहन करण्यासाठी भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. राजेंद्र देशमुख राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील हे उपस्थित होते. मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आटपाडीमध्ये दोन्ही पॅनेल बरोबरीत –
भाजप – राष्ट्रवादी – ९
शिवसेना शिंदे गट – रासप – काँग्रेस – ९
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!