Head linesMaharashtraPachhim Maharashtra

शेवगाव बाजार समितीवर घुलेबंधुंचेच वर्चस्व, भाजपचा सुफडासाफ!

– भाजपच्या आदिनाथ विकास मंडळाचा दारूण पराभव, आ. मोनिका राजळेंना जोरदार झटका!

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – बहुचर्चित शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित श्री ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाने १८ पैकी १८ जागा मोठ्या फरकाने जिंकून सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. तर भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या भाजपप्रणित आदिनाथ विकास मंडळाचा मोठ्या फरकाने दारुण पराभव झाला आहे. माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे या बाजार समितीवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी दोन अपक्षांसह एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आज रविवारी सकाळी शेवगाव येथे रेसिडेन्सील हायस्कूलमध्ये अत्यंत चुरसपूर्ण वातावरणात २१८७ पैकी २१३७ मतदारांनी विक्रमी ९७.७१ टक्के मतदान नोंदवले होते. सेवा सोसायटी मतदार संघात ९११ मतदान पैकी ८८९ मतदान झाले, तर ग्रामपंचायत मतदार संघात ८६९ पैकी ८४४ मतदान झाले. व्यापारी मतदारसंघात १८६ पैकी १८३ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. हमाल मापाडी मतदारसंघात २२१ पैकी २२१ मतदारांनी शंभर टक्के मतदान झाले तर सायंकाळीं तहसील कार्यालयात ५ वाजता मतमोजणी सुरु झाली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही यु लकवाल, सहाय्यक म्हणून जी ए विखे, ए एन लोखंडे, डी एस अभंग यांनी काम केले.

भाजपच्या आ. मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. परंतु मतदारांनी त्यांना झिडकारले तर भाजपाला गटबाजीचा मोठा फटाका बसून, ही एकतर्फी झाल्याचे मतदान आकडेवारी वरून दिसत आहे. भाजपाला सेवा सोसायटीत मतदारसंघात १८० ते २२० मते मिळाली, तर राष्ट्रवादी ६०० ते ६८० पर्यंत ५ मते मिळाली आहेत.
विजयी उमेदवार
सेवा सोसायटी मतदासंघ –
कसाळ एकनाथ दिनकर -६३१
खंबरे गणेश बाबसाहेब -६२६
धस अशोक आण्णासाहेब ६२९
पटेल जमीर अब्बास,६१९
बेडके राहुल शंकर, ६३२
मडके अनिल बबनराव, ६२७ मडके नानासाहेब बबन,६१५

महिला राखीव –
कातकडे चंद्रकला श्रीकिसन, ६७९
लांडे रागिणी सुधाकर, ६८२
सर्वसाधारण प्रवर्ग –

पातकळ हनुमान बापूराव, ६६४
सेवा सोसायटी विमुक्त जाती,भटक्या जमाती-
दौंड राजेन्द्र शिवनाथ -६७९
ग्रामपंचायत मतदासंघ सर्वसाधारण –
कोळगे संजय मोहन ५३७,
मेरड अशोक रामभाऊ ५१५,

आर्थकदृष्टया दुर्बल घटक

अंधारे प्रिती रामभाऊ ५३४

ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग-
घाडगे अरुण भास्कर -५४९
व्यापारी मतदार संघ –

तिवारी मनोज काशिनाथ १५८,

कुरेशी जाकिर शफी १५३
हमाल मापडी मतदारसंघ

काळे प्रदीप नानासाहेब १८९ .
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!