भाजप-शिंदे गटाचा ‘करेक्ट कार्यक्रम’! चिखली, शेगाव, नांदुरा, जळगाव जामाेद बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा; चिखलीत ‘बळीराजा’ची ‘विमान’ भरारी!
ही अपडेट बातमी वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करत रहा…
अपडेट
– जळगाव जामाेद बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व 11 जागा जिंकल्या
– लोणार – बाजार समितीवर शिंदे गटाचाच झेंडा फडकला
– लोणार – महाविकास आघाडी 6, शिवसेना (शिंदे) 12 जागा
– नांदुरा – आ. राजेश एकडे यांच्या गटाला 13 जागा, भाजपला फक्त 5 जागा
– चिखली बाजार समितीत भाजपचा सुफडासाफ, मिळाली फक्त 1 जागा
– चिखली – अडत व्यापारी मतदार संघातून महाविकास आघाडीचे (बळीराजा पॅनल -काँग्रेस) जय बोंद्रे, आणि नीरज चौधरी विजयी.
– चिखली – ग्रामपंचायत मतदारसंघातून महाविकास आघाडीचे मनोज लाहुडकर व राम खेडेकर विजयी
– लोणार – व्यापारी मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनिरुद्ध गायकवाड आणि तेजराव घायाळ विजयी
– शेगाव – बाजार समितीत दादा व नानांची सरशी, 18 पैकी 18 जागा जिंकल्या!
– चिखली – भाजप-शिंदे गट युतीचे मयूर अग्रवाल व संतोष खबुतरे यांचा पराभव
– आमदार संजय कुटे यांना मोठा धक्का; शेगांव कृषी बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा
– महाविकास आघाडीचे सर्वही १८ उमेदवार विजयी, भाजप, वंचित आघाडीचा सुफडा साफ
– चिखली – महाविकास आघाडीच्या खात्यात आठ जागा, समाधान पाटील परिहार, विष्णू पाटीलही जिंकले
– जळगाव जामोद – प्रसेनजित पाटील किंगमेकर – शेतकरी सहकार पॅनल-११, शेतकरी विकास पॅनल-७
– चिखली – सोसायटी मतदार संघ महाविकास आघाडी एकूण 83 मताची आघाडी
– लोणार – महाविकास आघाडीचे अनिरुद्ध गायकवाड, तेजराव वायाळ विजयी
– चिखली – महाविकास आघाडी (बळीराजा) चे रामभाऊ जाधव विजयी
– चिखली – कृष्णा मिसाळ विजयी (बळीराजा-महाविकास आघाडी)
– चिखली बाजार समिती विजयी उमेदवार –
सहकारी संस्था मतदारसंघ
१. पांडुरंग भुतेकर
२. समाधान सुपेकर
३. संतोष वाकडे
४. श्रीकृष्ण मिसाळ
५. परमेश्वर पवार
६. श्रीकृष्ण धोंडगे
७. गणेश थुट्टे
८. डॉ. संतोष वानखेडे
ग्रामपंचायत मतदारसंघ
१. मनोज लाहुडकार
२. रामेश्वर खेडेकर
३. समाधान परिहार
४. संजय गवई
अडते व्यापारी मतदारसंघ
१. जय सुभाषअप्पा बोंद्रे
२. नीरज चौधरी
महिला राखीव
१. सौ. कमल विष्णू कुळसुंदर
२. श्रीमती मंदा शेणफड भुतेकर
विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्ग
१.रामेश्वर जाधव
– हमाल मापारी मतदारसंघ
१. राजेश गजानन पवार (सहकार परिवर्त पॅनल – भाजप)
———-
*बळीराजा पॅनल (मविआ) – 17*
*सहकार परिवर्तन पॅनल (भाजप) – 1*
– लोणार – महाविकास आघाडीला 6, शिंदे गटाला 12 जागा
– चिखली बाजार समितीत भाजपचा सुफडासाफ, मिळाली फक्त 1 जागा
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील चिखली, लोणार, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा या पाच बाजार समित्यांसाठी आज मतदान पार पडले असून, सकाळी निरूत्साह होता तर दुपारनंतर चुरशीचे मतदान झाले. या मतदानाची मोजणी पार पडली असून, महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील पॅनलची सरशी झाली आहे. शिंदे गट व भाजपच्या आमदारांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करेक्ट कार्यक्रम केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या दादा व नानांच्या पॅनलने बाजी मारली असून, एकहाती सत्ता मिळवत भाजपचे आ. संजय कुटे यांना झटका दिला आहे. तर लोणारमध्ये खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वातील पॅनलची कसोटी लागली खरी, पण सत्ता मिळाली. येथे शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील पॅनलला तीन जागा मिळाल्या आहेत. चिखलीत आ. श्वेताताई महाले यांच्या सहकार परिवर्तन पॅनलला मतदारांनी धूळ चारली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील बळीराजा पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकून बाजार समितीची सत्ता पुन्हा एकदा ताब्यात घेतली आहे. श्वेताताई महाले यांच्यासारख्या भाजपच्या विद्यमान आमदारांचा हा पराभव मानला जात असून, त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. नांदुरा व जळगाव जामाेद बाजार समित्यांतही महाविकास आघाडीचीच सत्ता आली आहे. म्हणजे, पाचपैकी फक्त एक बाजार समिती जिंकण्यात शिंदे गटाला यश आले असून, चार बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. तर या निवडणुकांत भाजपला मतदारांनी झिडकारले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पाच बाजार समित्यांचे निकाल जाहीर झाले असून, पाचपैकी तीन बाजार समित्यांवर महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील तर शिंदे गट एक व भाजपला एक बाजार समिती मिळाली आहे. आता उर्वरित चिखली, लोणार, नांदुरा, शेगाव व जळगाव जामोद बाजार समित्यांसाठी आज सायंकाळपर्यंत मतदान पार पडले. त्यानंतर लगेचच मतमोजणी हाती घेण्यात आली असून, वृत्त लिहिपर्यंत शेगावमध्ये दादा व नानांच्या पॅनलने राजकीय चमत्कार घडवत आ. संजय कुटे यांच्या पॅनलचा सुफडा साफ केला होता. तर लोणारमध्ये शिंदे गटाने सत्ता राखली हाेती. त्यांना 12 तर महाविकास आघाडीला 6 जागा मिळाल्यात. चिखलीतील मतमाेजणी संपली असून, महाविकास आघाडीने ही बाजार समिती ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या सहकार परिवर्तन पॅनलला चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी धूळ चारली असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी प्रणित बळीराजा पॅनलला भरभरून मते दिली आहेत. या बाजार समितीत बळीराजा पॅनलच्या १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकून आल्या असून, सहकार परिवर्तन पॅनलला फक्त एक जागा जिंकता आली आहे. आ. श्वेताताई महाले यांच्यासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा निकाल लिटमस टेस्ट ठरणारा आहे. येथे भाजप समर्थित सहकार पॅनलचे हमाल व मापारीमधून राजेश गजानन पवार हे एकमेव विजयी झाले आहेत. या बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते आ. राजेंद्र शिंगणे व माजी आ. राहुल बाेंद्रे यांनी भाजपच्या आ. श्वेताताई महाले यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याचे राजकीय चित्र आहे. नांदुरा व जळगाव जामोदमध्येही मतमोजणी सुरू होती. शेगाव बाजार समितीत भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या पॅनलचा सुफडा साफ झाला आहे. एकूणच भाजपच्या आमदारांना मतदारांनी धूळ चारल्याचे राजकीय चित्र आहे. तर नांदुरा बाजार समितीत आ. राजेश एकडे यांच्या गटाला 13 जागा, तर भाजपला फक्त 5 जागा मिळाल्याने, आ. एकडेंना बाजार समितीची सत्ता मिळवण्यात यश आले आहे. तर जळगाव जामाेद बाजार समितीतही महाविकास आघाडीला 11 जागा मिळाल्या आहेत.
महाविकास आघाडी प्रणित बळीराजा पॅनलच्या विजयी उमेदवारांची यादी
सहकारी संस्था मतदारसंघ
१. पांडुरंग भुतेकर
२. समाधान सुपेकर
३. संतोष वाकडे
४. श्रीकृष्ण मिसाळ
५. परमेश्वर पवार
६. श्रीकृष्ण धोंडगे
७. गणेश थुट्टे
८. डॉ. संतोष वानखेडे
ग्रामपंचायत मतदारसंघ
१. मनोज लाहुडकार
२. रामेश्वर खेडेकर
३. समाधान परिहार
४. संजय गवई
अडते व्यापारी मतदारसंघ
१. जय सुभाषअप्पा बोंद्रे
२. नीरज चौधरी
महिला राखीव
१. सौ. कमल विष्णू कुळसुंदर
२. श्रीमती मंदा शेणफड भुतेकर
विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्ग
१.रामेश्वर जाधव
– हमाल मापारी मतदारसंघ
१. राजेश गजानन पवार (सहकार परिवर्त पॅनल – भाजप)
———-