– भाजपच्या सहकार परिवर्तन पॅनलला फक्त एक जागा; बळीराजा पॅनलने जिंकल्या १७ जागा
चिखली/बुलढाणा (बाळू वानखेडे) – भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या सहकार परिवर्तन पॅनलला चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी धूळ चारली असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी प्रणित बळीराजा पॅनलला भरभरून मते दिली आहेत. या बाजार समितीत बळीराजा पॅनलच्या १८ पैकी तब्बल १७ जागा िंजकून आल्या असून, सहकार परिवर्तन पॅनलला फक्त एक जागा जिंकता आली आहे. आ. श्वेताताई महाले यांच्यासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा निकाल लिटमस टेस्ट ठरणारा आहे.
ही बाजार समिती जिंकण्यासाठी आ. श्वेताताई महाले यांनी जंगजंग पछाडले होते. जोरदार राजकीय रणनीती आखली होती. माजी आमदार तथा भाजपचे नेते धृपतराव सावळे यांनीदेखील त्यांच्यासाठी शेवटच्याक्षणी फोनाफोनी केली होती. परंतु, या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार परिवर्तन पॅनलचा सुफडासाफ झाला असून, भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. ज्या एका हमाल मापारी मतदारसंघातून राजेश गजानन पवार हे विजयी झालेत, ती जागा शिंदे गटाची आहे. त्यामुळे शेगाव बाजार समिती पाठोपाठ चिखलीतही मतदारांनी भाजपला नाकारले असल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपच्या दोन्ही आमदारांवर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. बळीराजा पॅनलच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस), माजी आ. राहुल बोंद्रे (काँग्रेस जिल्हाध्यक्ष) व प्रा. नरेंद्र खेडेकर (शिवसेना-ठाकरे) यांनी जोरदार रणनीती आखली होती. मतदारांची या बळीराजा पॅनलला सहानुभूती होतीच, त्यातच काँग्रेसच्या विद्यमान संचालकांचे अर्ज बाद करण्याची जी खेळी खेळली गेली, त्याचाही राग मतदारांच्या मनात होता. तो राग अखेर मतपेटीतून बाहेर पडला.
महाविकास आघाडी प्रणित बळीराजा पॅनलच्या विजयी उमेदवारांची यादी
सहकारी संस्था मतदारसंघ
१. पांडुरंग भुतेकर
२. समाधान सुपेकर
३. संतोष वाकडे
४. श्रीकृष्ण मिसाळ
५. परमेश्वर पवार
६. श्रीकृष्ण धोंडगे
७. गणेश थुट्टे
८. डॉ. संतोष वानखेडे
ग्रामपंचायत मतदारसंघ
१. मनोज लाहुडकार
२. रामेश्वर खेडेकर
३. समाधान परिहार
४. संजय गवई
अडते व्यापारी मतदारसंघ
१. जय सुभाषअप्पा बोंद्रे
२. नीरज चौधरी
महिला राखीव
१. सौ. कमल विष्णू कुळसुंदर
२. श्रीमती मंदा शेणफड भुतेकर
विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्ग
१.रामेश्वर जाधव
– हमाल मापारी मतदारसंघ
१. राजेश गजानन पवार (सहकार परिवर्त पॅनल – भाजप)
———-