BULDHANAHead linesVidharbha

भरधाव बीएमडब्लू डिव्हायडरला धडकली, महिला जागीच ठार

जखमी झालेली तीन वर्षीय बालिका.

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, हा महामार्ग बुलढाणा जिल्ह्यात अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. आज सायंकाळच्या सुमारास सिंदखेडराजा टोलनाक्याजवळ भरधाव बीएमडब्लू कारचा डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला असून, या अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली, तर कारचालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने तीनवर्षीय चिमुकली बचावली आहे.

आज सकाळी वर्धा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात एका महिला पोलिस निरीक्षकाचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला असतानाच, सिंदखेडराजा येथे भरधाव कारचा अपघात घडला. अपघातग्रस्त बीएमडब्यू कार मुंबईहून नागपूरकडे निघाली होती. कार महामार्गावरून भरधाव जात असताना सिंदखेडराजा टोलनाक्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली. अपघातातून तीन वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली, तर कारचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, जखमींना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.  सिंदखेडराजा पाेलिस अधीक तपास करत आहेत.


सिल्वासा, दादरा नगर हवेली येथून जीवन महाडिक व त्यांचे कुटुंबीय हे नागपूर येथे जात होते. दरम्यान सिंदखेडराजा शहरानजीकच्या टोलनाक्यावजवळ कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यामध्ये निलम महाडिक यांचा सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर जीवन महाडिक हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या समवेत असलेले यश महाडिक (१२ वर्षे), सोहम महाडिक (१२ वर्षे), सौम्या महाडिक (४ वर्षे) हे तिघे सुखरूप आहेत. दरम्यान त्यांच्या सोबतच जवळपास ७ लाख रुपये रोख व काही दागिनेही होते, अशी माहिती असून ते पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!