– ग्रामस्थांच्या सह्यासह सविस्तर निवेदन बोराखडी ठाणेदारांना सादर
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – मोताळा तालुक्यातील ग्रामपंचायत तळणी कार्यक्षेत्रात मौजे तळणी येथे अवैध दारूविक्री व वरली मटका सुरु असल्यामुळे गावातील तरुणपिढी व्यासनाधीन होऊन गावातील सामाजिक वातावरण खराब होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत तळणी कार्यक्षेत्रातील मौजे तळणी येथे सुरु असलेली अवैध दारुविक्री बंद करण्याबाबत ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात येवून अवैध दारु विक्री व वरली मटका बंद करण्यासाठी पोलिस स्टेशन बोराखेडी ठरावाद्वारे कळविण्यात यावे, असे सभेत सर्वानुमते ठरले. त्यानुसार, बोराखडी ठाणेदारांना ठराव व सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद आहे, की तळणी गावात फार मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्रीची प्रमाण वाढले आहे. सर्व गावकरी मंडळींची इच्छा आहे की, तळणी गावातील अवैध दारूविक्री ही बंद करण्यात यावी, जेणेकरून नवीन पिढी व्यसनापासून दूर राहील व त्यांचे भवितव्य उज्ज्वल राहिल. अशा मागणीचे निवेदन आज, दि.२२ एप्रिल रोजी बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गिते यांना देण्यात आले. सदर निवेदनावर सरपंच सौ. वत्सलाबाई शेषराव बोदडे, उपसरपंच सौ.जयश्री प्रविण नारखेडे, सर्वश्री ग्रामपंचायत सदस्य संदीप झोपे, उध्दव नाफडे, किरण नाफडे, निलेश इंगळे, पोलीस पाटील गजानन नारखेडे, तंटामुक्ती अध्यक्ष संदिप झोपे, शेषराव बोदडे, प्रविण नारखेडे, प्रदीप नाफडे, प्रशांत नाफडे, मिलिंद बोदडे, बळीराम अंभोरे, प्रशांत बोदडे, सागर बोदडे, मिलिंद तायडे, संदिप जाधव, नितिन ब-हाटे, स्वप्नील नारखेडे, चेतन वाघोदे, विजय इंगळे, शे.मन्वर शे.इस्माईल, गजानन तायडे, शामराव गाढे, शे.मुस्ताक शे.अहमद, सुरेश बोदडे, वासुदेव बोदडे, कमलाबाई बाळु जाधव, नलु राजेंद्र जाधव, आत्माराम अंभोरे, गणेश जाधव, विजय जाधव, नामदेव अंभोरे, ओंकार अंभोरे, पुजांजी बोंडे, निळकंठ नारखेडे, बाबुराव खानंदे, विजय तायडे, दिपक तायडे, विशाल सुरडकर, आकाश चव्हाण, श्रीकृष्ण सातव, अर्चना प्रशांत बोदडे, राहुल बोदडे यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
————