BULDHANA

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बुलढाण्यात सायकल रॅली

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – सामाजिक वणीकरण विभाग, राष्ट्रीय हरित सेना व पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी पृथ्वी वाचवा व पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने शहरातील विविध भागातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला.

या कार्यक्रमाला जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपूते, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, सहा. वनसंरक्षक सारीका घेवंदे, प्रजापित्ता ब्रम्हकूमारीच्या प्रमुख दिदि, मिनल आंबेकर, जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे माकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व सायकल रॅलीत सहभागी विद्यार्थी व नागरिकांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली. तसेच प्रजापिता ब्रम्हकूमारीच्या वतीने वसुंधरा वाचवा या विषयावर मुग्धा कंगले हिच्या चमूने नृत्य सादर केले. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
गांधी भवनातून प्रारंभ झालेली सायकल रॅली शहरातील जुना गाव, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, संगम चौक, बस स्थानकासमारून चिंचोले चौक, सर्क्यूलर रोडने त्रिशरण चौक, चिखली रोडने जात वनविभागाच्या राणीबागेत या सायकल रॅलीचा समारोप झाला. या सायकल रॅलीत प्रबोधन विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरण मित्र डांगे यांनी गोरीला माकडाचा गणवेश परिधान करून जंगल वाचवा प्राणी वाचवा हा संदेश दिला. तसेच उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या हस्ते राणीबगीच्यात जागतिक वसुंधरेच्या भितीचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल विश्वास थोरात, अभिजीत ठाकरे राष्ट्रीय हरित सेना शिक्षक रविंद्र गणेशे, अनिरूद्ध माकोने, डांगे, बापु देशमुख, चंद्रकांत काटकर, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचलन वनक्षेत्रपाल विश्वास थोरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपाल रमेश गिते, सतिष इंगळे, वनरक्षक संजय दळवी, आनंद दारमोडे, निलेश राजपूत, सोनाली गावंडे, जोत्सना देवगावकर, संतोष शिंगणे, दिलीप भोंबे, विजय लांडे, विश्वनाथ वाघोदे यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!