Breaking newsHead linesMaharashtraMumbaiWorld update

अदर पुनावाला, ‘सीरम’ इन्सिट्यूटवर १० हजार कोटींच्या मानहानीचा दावा!

– प्रकाश पोहरे यांनी ‘सीरम’विरुद्ध दाखल केला सर्वात मोठा मानहानीचा खटला!

नागपूर (खास प्रतिनिधी) – ‘सीरम’ इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशील्ड’मुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, तर अनेकांना गंभीर आजार झाले आहे. याविराेधात आवाज उठविल्याबद्दल सीरमने पाेलिसी व कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हे दाखलची मागणी केली. तथापि, ती मान्य झाली नाही.  त्यात मानहानी झाल्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटने दहा हजार कोटींची भरपाई द्यावी, अशी विनंती करणारी याचिका विदर्भातील आघाडीचे दैनिक देशोन्नतीचे मुख्यसंपादक, ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’चे वरिष्ठ सदस्य तथा देशातील प्रमुख शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी नागपुरातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरून न्यायालयाने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटसह तिघांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘सीरम’ला तब्बल दहा हजार कोटींची मानहानी भरपाई मागण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. तर नियमानुसार ६० दिवसांच्याआत म्हणणे सादर करणे ‘सीरम’ व अदर पुनावाला यांना बंधनकारक आहे. अन्यथा, न्यायालय एकतर्फी निकाल देऊ शकते.

सीरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशील्ड’मुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, तर अनेकांना गंभीर आजार झालेत. तरीसुद्धा सीरम इन्स्टिट्यूटने त्यांची लस ही पूर्णतः सुरक्षित आहे, असा खोटा दावा करून फसवणुकीने लसीकरण करून जनतेचे जीव धोक्यात आणले. परिणामी, अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’चे वरिष्ठ सदस्य, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक, शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी व संघटनेच्या इतर सदस्यांनी देशभर जनजागृती अभियान राबवून कोविशील्डच्या जीवघेण्या दुष्परिणामाची माहिती व पुरावे नागरिकांना देऊन अनेकांचे प्राण वाचविले. या अभियानामुळे जवळपास ७० कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी कोरोना लसींचे बूस्टर डोज घेण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून जावून सीरम इन्स्टिट्यूटने ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’च्या (एआयएम) सदस्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली, की त्यांच्या लसीमुळे कोणीही मरत नाही तरीसुद्धा अपप्रचार केला जात असल्यामुळे एआयएमच्या सर्व सदस्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. एआयएमच्या सदस्यांनी भारत सरकारच्या लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांच्या (एईएफआय) चौकशी समितीचे अहवाल आणि इतर सबळ पुरावे देवून सीरम इन्स्टिटयूटची तक्रार कशी खोटी व खोडसाळ आहे हे सर्वांच्या निदर्शनास आणले. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर देशभरातून संघटनेच्या तीन हजार सदस्यांनी १०० ते एक हजार कोटींच्या नोटिसा सीरम इन्स्टिट्यूटला पाठविल्या. प्रकाश पोहरे यांनीसुद्धा समाजात मानहानी केल्याप्रकरणी अदर पुनावाला व सीरम कंपनीला दहा हजार कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठविली. त्याला उत्तर न मिळाल्यामुळे पोहरे यांनी न्यायालयात दावा दाखल केला. सीरम इन्स्टिट्यूटने दहा हजार कोटींची नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती करणारी याचिका प्रकाश पोहरे यांनी नागपुरातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने सीरम इन्सिट्यूटसह तिघांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशाने अनेकांच्या न्यायाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. बी. पवार यांनी हे निर्देश दिले आहेत.

येथे वाचा कोर्ट नोटीसची प्रत

ही याचिका दाखल करण्यासाठी प्रकाश पोहरे यांना तीन लाख रुपये न्यायालयात जमा करावे लागले. त्यानंतर १५ एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला आणि अधिकृत अधिकारी विवेक प्रधान यांना नोटीस बजावून २० एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वत: उपस्थित राहून अथवा वकिलांमार्फत उत्तर न दिल्यास, न्यायालय त्यांच्या गैरहजेरीमध्ये या प्रकरणाचा निपटरा करेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. लसीकरण सुरक्षित आहे, अशी खोटी माहिती पसरवून लोकांना लसीकरण का करण्यात आले?, असा प्रश्नही न्यायालयाने याप्रसंगी उपस्थित केला.

परंतु, प्रतिवादींच्या वकिलांनी उत्तर सादर करण्यास वेळ मागून घेतला. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावला यांनी कोविशील्ड लसीपासून होणार्‍या गंभीर दुष्परिणामाची माहिती जनतेपासून लपवून ठेवली, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. कोविशील्ड लस घेतलेल्या खासकरून युवकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. युवकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूपच वाढले आहे. सोबतच लकवा, गुडघ्याचे दुखणे, जॉइंट पेन, आंधळेपणा, बहिरेपणा, मधूमेह, मूत्रपिंड निकामी होणे, कर्करोग, त्वचारोग आणि मेंंदूशी संबंधित समस्या सामोर आल्या आहेत. तसेच कोणत्याही आजाराशी लढण्याची शरीराची प्रतिकार क्षमता कमी झाल्याच्या समस्यासुद्धा कोविशील्ड लसीशी जुडलेल्या आहेत. कोरोना या आजारापेक्षा लसीकरणामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे जगभरातील संशोधनातून पुढे आले असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूट आता काय उत्तर देणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्त्यातर्पेâ माजी न्यायमूर्ती ओंकार काकडे यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून बाजू मांडली. सदर अभियानात इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. नीलेश ओझा हे पूर्वीपासूनच सामाजिक कर्तव्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांना विविध संघटनांकडून भरघोस समर्थन मिळत आहे.


‘कोविशील्ड’च्या लसीकरणाविरोधात प्रकाश पोहरेंसह ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ने उठविला होता आवाज!

प्रकाश पोहरे

लसीकरणाच्या गंभीर व जीवघेण्या दुष्परिणामामुळेच एकवीस युरोपीयन देशांनी कोविशील्ड लसीवर बंदी घातली. परंतु, अदर पुनावाला व त्यांचा भागीदार बिल गेटस् यांनी देशातील केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याशी हातमिळवणी करून संपूर्ण देशात कोविशील्ड लसीकरण चालवले. ही लस सुरक्षित असल्याचे खोटे सांगून जबरदस्तीने लसीकरण करून देशातील कोट्यवधी नागरिकांचे जीव धोक्यात घातले. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. अवेकन इंडिया मुव्हमेंटद्वारे चळवळ उभी करण्यात आली. या चळवळीत इंडियन लॉयर्स अ‍ॅण्ड ह्युमन राईटस असोसिएशन, इंडियन बार असोसिएशन आदी संघटना सहभागी झाल्या. या चळवळीमुळे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानेही वेळोवेळी लसीकरणाच्या जबरदस्तीविरोधात आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयात प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण आणि उच्च न्यायालयात अ‍ॅड. नीलेश ओझा यांनी वेळोवेळी बाजू मांडली. लसीकरणाच्या या चळवळीचे हे मोठे यश असल्याची माहिती याचिकाकर्ते प्रकाश पोहरे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना दिली. ही एकट्याची लढाई नाही. मानवजातीची लढाई आहे. त्यामुळे या चळवळीशी जुळणार्‍यांचे स्वागत असल्याचेही पोहरे यांनी यावेळी स्पष्ट केले. दिवाणी खटल्याच्या तरतुदीनुसार अदर पुनावाला व सीरमला आता ६० दिवसांच्याआत न्यायालयीन नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. अन्यथा, एकतर्फी निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.


‘कोविशील्ड’च्या लसीकरणामुळे पुढील आजार झाल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा!

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावला यांनी कोविशील्ड लसीपासून होणार्‍या गंभीर दुष्परिणामाची माहिती जनतेपासून लपवून ठेवली, असा आरोप या याचिकेत करण्यात आला. कोविशील्डमुळे युवकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूपच वाढले आहे. सोबतच लकवा, गुडघ्याचे दुखणे, जॉइंट पेन, आंधळेपणा, बहिरेपणा, मधूमेह, मूत्रपिंड निकामी होणे, कर्करोग, त्वचारोग आणि मेंंदूशी संबंधित समस्या सामोर आल्या आहेत. तसेच कोणत्याही आजाराशी लढण्याची शरीराची प्रतिकार क्षमता कमी झाल्याच्या समस्यासुद्धा कोविशील्ड लसीशी जुडलेल्या आहेत. कोरोना या आजारापेक्षा लसीकरणामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे जगभरातील संशोधनातून पुढे आले असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!