बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आपल्या बुलढाणा शहरामध्ये ‘रेडिओ वेलकम ९०.८ एफएम आवाज बुलढाण्याचा’ या रेडिओ केंद्रांत रविवार, दिनांक २३ एप्रिलला सकाळी ९ वाजता, दुपारी ४ वाजता, रात्री ८ वाजता शब्द साहित्यिकांचे या कार्यक्रमांंतर्गत दिग्गज मान्यवरांनी केलेल्या कविता त्यांच्याच स्वरात प्रसारीत होणार आहेत, या कार्यक्रमाचे संकलक पुरुषोत्तम बोर्डे, निवेदन आर. जे. नरेंद्र आणि यात सहभागी झालेले दिग्गज कवी आहेत सर्वांना सुपरीचित असलेले प्रा. डॉ गोविंद गायकी, जेष्ठ पत्रकार मराठी पत्रकार परिषदचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, रमेश जनार्दन खंडारे सर, संदीप विष्णू राऊत, सौ वैशाली दिलीप तायडे, डॉ मंजुश्री हर्षानंद खोब्रागडे, सुदाम खरे, शाहीर जगनाथ बुधवत हे आहेत.
या कविंच्या सुंदरशा आवाजात शब्दबध्द केलेल्या कवितांचा जरूर आस्वाद घेण्यासाठी रेडिओ एफ एम ९०.८ वर तसेच आपल्या मोबाईलमध्ये आजच प्ले स्टोअरला जाऊन रेडिओ वेलकम ९०.८ एफ एम अॅप डाउनलोड करा तसेच एफ एस रेडीओवर सुद्धा ९०.८ वर सुद्धा हा कार्यक्रम ऐकू शकता. तर एकायला विसरू नका असे आवाहन मुख्य संचालक संजय तुपकर, भारत जाधव, अभिमन्यु गाडे, अंकुश नवले यांनी केले आहे. तर रेडीओ वेलकम एफ एम केंद्र आपल्या बुलढाण्यात पहिल्यांदा सुरु केले असल्याने.सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून संचालकांचे अभिनंदन होत आहे. दररोज या केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे प्रसारण केल्या जात आहे, त्याचाही आस्वाद रसिकांनी घ्यावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.