मलकापूर पांग्रा (डॉ. गंगाराम उबाळे) – बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा त्यांच्या अनुयायींसाठी सण असतो. या जयंतीला गावाकडे जावे आणि जयंती साजरी करावी, अशी दलित बांधवांसह बाबासाहेबांच्या अनुयायींची तीव्र इच्छा असते. परंतु, काही अडचणींमुळे त्यांना गावी येता येत नाही. त्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील कामगार व इतर बांधवांनी मुंबईतच बाबासाहेबांची जयंती हर्षोल्हासात साजरी केली व बाबासाहेबांना अभिवादन केले.
सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवानी येथील डॉ. विजय संपत ससाने यांच्यासह गावातील बरेच कामगार हे मुंबई येथे कामानिमित्त गेलेले आहेत. १४ एप्रिल हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. यानिमित्त जन्मभूमीला, आपल्या गावी येण्याची इच्छा असते, परंतु मुलांच्या परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये सुरू असताना आपण गावी येऊ शकत नाही, हा सर्व गावाकडील मंडळींचा अनुभव असतो. त्यामुळे मुंबई येथे वास्तव्यास असलेले विदर्भ विकास सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विजय संपत ससाने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आपण मुंबईला सादरी करू, असा निर्णय घेतला. आणि, खूप मोठ्या उत्साहात गावाकडील मित्र मंडळी व नातेवाईकासह ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक सिद्धार्थ खरात (सहसचिव गृह विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य), रेडकर साहेब (व्यवस्थापक पोईसर आगार), अशोक मुळे, संतोष शिरसाट, प्रदीप गवई, शेजुळ साहेब, देविदास मोरे सर, खरात सर, वीणकर, वाघमारे, घोलप, गायकवाड, कुटे, इंगळे, साळवे, राठोड, वाहक प्रशांत ससाने, चव्हाण, मस्के, साबळे, कटारे, डोंगरदिवे, आचलखांब, काळे, भाऊराव सदावर्ते आदींनी या जयंतीसाठी परिश्रम घेतले.