BULDHANAVidharbha

यापुढे टपरूट लोकांना बैठकीत आणल्यास हाकलून देऊ; आ. संजय गायकवाड यांचा इशारा

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – काही टपरूट लोकांना सोबत घेऊन त्यांच्यासमोर बैठकीत शासकीय अधिकार्‍याला अत्यंत हीन भाषेत अपमानित करणे, त्याचा उपमर्द करणे योग्य नाही. असे सांगतानाच पदवीधर आमदारांनी यापुढे टपरूट लोकांना सोबत बैठकीला आणल्यास त्यांना बैठकीतून हाकलून देऊ, असा धमकीवजा इशारा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी पदवीधर आमदार धीरज लिंगाडे यांना दिला.

आमदाराचे जनसंपर्क कार्यालय मातोश्री कार्यालयात १९ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पदविधर विधानसभा क्षेत्राचे आमदार धीरज लिंगाडे यांना त्यांच्या कामकाजाबाबत शासकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेण्याचा अधिकार आहे. अशा बैठकांमध्ये सर्वसामान्य नागरिकाला उपस्थित राहून आपल्या समस्या किंवा गर्‍हाणे मांडण्याची अनुमती असू शकते. मात्र काही टपरूट लोकांना सोबत घेवून त्यांच्यासमोर शासकीय अधिकार्‍याला अत्यंत हीन भाषेत अपमानित करने, त्याचा उपमर्द करने योग्य नाही, असे सांगतानाचं पदविधर आमदारांनी यापुढे टपरूट लोकांना सोबत घेवून बैठका न घेण्याचा सल्ला दिला. एका प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणाले की, माजी आमदाराने त्यांच्या पाच वर्षात काय केले. माझे तुलनेत त्यांनी केलेले एक टक्का काम दाखवावे अन् मग क्रॉस करावे. मार्ग न काढता फक्त धमक्या द्यायच्या असे त्यांचे वर्तन आहे. मात्र अशा धमक्या देणार्‍याना आडवं पाडून मी माझा मार्ग काढेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आमदार संजय गायकवाड पुढे म्हणाले की, बुलडाणा नगर परिषदेची इमारत १३० वर्षाची आहे. शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शहराची सीमा पाच किलोमीटर पर्यत वाढली आहे. त्यामुळे भविष्यात नगर पारिषदेचे मुख्यालय त्रीशरण चौकातील डिएड महाविदयालयाच्या जागेत होणार आहे. भूविकास बँकेच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज टाउन हॉल उभारण्यात येणार आहे. तर शहरातील गांधी भवनाच्या मागील मोकळया जागेत बेरोजगारांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त चौपाटीचे निर्माण केले जाणार आहे. या तीनही जागांना मंजुरात देण्यासंदर्भातील आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरचं काढणार असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.
शहरातील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी दुकाने बांधून देण्याचे काम नगर पालिकेकडून केले जात आहे. लवकरचं शहर अतिक्रमणमुक्त होईल असेही त्यांनी सांगितले. विरोधकांना ठणकावतांना ते म्हणाले की, विकास कामात अडथळे आणण्याचे काम त्यांनी करू नये. माझे सरकार आहे. मी सरकारी योजनांची कामे आणतो. मी निधी आणतो त्यामुळे विरोधकांनी उगीचं ढवळाढवळ करू नये, असा इशाराही त्यांनी शेवटी विरोधकांना दिला. यावेळी बुलडाणा नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!