आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : विचार नियमचे रचनाकार सरश्री यांच्या मार्गदर्शनाखाली तेज ज्ञान फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मनन आश्रम नांदोशी गाव किरकिटवाडी फाटा, सिंहगड रोड या ठिकाणी १९ ते २३ एप्रिल या कालावधीत महाआसमानी परम ज्ञान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात भय, चिंता, क्रोध बोरडम, मोह आणि तणाव अशा नकारात्मक विचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. आपल्या जीवनात दमदार ध्येय कसे प्राप्त करावे. भयमुक्त , दुःख मुक्त जीवन कसे जगावे. प्रत्येक समस्येचे समाधान मिळविण्यासाठी कला कशी प्राप्त करावी. तसेच वर्तमानात तणाव मुक्त व आनंदी जीवन जगण्याची समज कशी प्राप्त करावी. यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. जास्तीत जास्त साधक भाविक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.