BuldanaChikhaliMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

चिखलीत अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन

चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – केंद्रातील भाजपा सरकारच्या माध्यामातून हुकूमशाही व जुलमी पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अग्निपथ ही अन्यायकारक योजना देशवासिंयावर लादली आहे, परिणामी तरूणांच्या भविष्या सोबत केंद्र सरकार जीवघेणे खेळ खेळत आहे. ज्या हुकूमशाही पध्दतीने शेतकर्‍यांवर लादलेले काळे कायदे, शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला रद्द करावे लागले, त्याच प्रमाणे अग्निपथ योजनासुध्दा केंद्र सरकारला मागे घ्यावेच लागेल, तसेच केंद्रातील मोदी सरकारने संरक्षण सेवेचे व्यापारीकरण थांबवावे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी चिखली येथे केले. अग्निपथ योजना मागे घ्यावी म्हणून चिखली तालुका, शहर, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व विविध सेलच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी सैनिकही स्वयंस्फुर्तीने मोठया संख्येने सहभागी झाले होते.
काँग्रेस कमिटीकडुन प्राप्त झालेल्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंंद्रे यांच्या नेतृत्वात सोमवार दिनांक ०४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ः३० वाजता स्थानिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चिखली येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, या देशाच्या सैन्याला मोदी सरकारच्या व्यापारीकरणाचा तडाखा बसत आहे. यापुर्वी दरवर्षी सुमारे ६० हजार तरूण सैन्यात भरती व्हायचे मात्र सन २०२० पासुन ही सैन्य भरती बंद पडली आहे. दिवसरात्र मेहनत करून विद्यार्थी सेनेत भरती होण्याकरीता कष्ट घेत असतात. अग्निपथ योजने अंतर्गत भरती झाल्यानंतर केवळ ४ वर्षाचीच सेवा ते देवू शकणार आहेत. प्रसंगी युध्दाचा काळ निर्माण झाल्यास ४ वर्षाच्या अल्पषः कार्यकाळातील तरूणांनी अनुभव नसतांना कशाप्रकारे युध्दाला सामोरे जायाचे व यातुन उद्भवलेल्या मनुष्य हानीला कोण जबाबदार असेल, हे मोदी सरकारने सर्वप्रथम स्पष्ट करावे असा प्रश्न यावेळी राहुलभाऊ बोंद्रे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ज्या पध्दतीने शेतक-यांसाठी बनविलेले काळे कायदे मोदी सरकारला रद्द करावे लागले, त्याच प्रमाणे अग्निपथ योजना ही मागे घ्यावीच लागेल आणि घेत नाही तोवर काँग्रेस शांत बसणार नाही.
यावेळी धरणे आंदोलनाला संबोधित करतांना कॉंग्रेसच्या विविध सेलच्या प्रमुख पदाधिका-यांनी आपल्या सतंप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, महिला जिल्हा कार्यध्यक्षा सौ. विजयाताई खडसन, भाई प्रदिप आंभोरे, डॉ. संतोष वानखेडे, श्रीमती प्रमिलाताई जाधव, किशोर कदम, जगन्नाथ पाटील, प्रकाश निकाळजे, डॉ. सत्येंद्र भुसारी, गजानन लांडे पाटील, अशोकराव पडघान, माजी सैनिक दगडुबा साबळे, रविंद्र सोनटक्के, यांच्यासह मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. यावेळी माजी सैनिकाच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी केंद्रातील मोदी सरकारने अन्यायकारक असलेली अग्निपथ योजना मागे घ्यावी या व इतर घोषणा देण्यात आल्या. तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, बुलडाणा तालुका कार्यध्यक्ष नंदुभाऊ शिंदे, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष किशोर सोळंकी, युवक तालुका अध्यक्ष मनोज लाहुडकर, शहर अध्यक्ष पप्पु जागृत, महिला कॉग्रेसच्या सौ. संगिताताई गाडेकर, सौ. विद्याताई देशमाने, माजी नगराध्यक्षा सौ. अरूणाताई कदम, दिपक देशमाने, पप्पुसेठ हरलालका, डॉ. मोहमंद इसरार, सचिन बोंदे, समाधान गिते, जय बोंद्रे, मो.आषिफ भाई, राजु रज्जाक, हाजी रउफभाई, विजय गाडेकर, गोकुळ शिंगणे, ज्ञानेश्वर सुरुशे, रामदास मोरे, अ‍ॅड.प्रशांत देशमुख, विजय जागृत, लक्ष्मणराव अंभोरे, भारत म्हस्के, रूपराव साळवे, शहजाद अली खान, ईष्वरराव इंगळे, विजय पाटील शेजोळ, जाकीर भाई, गजानन लांडे पाटील, किशोर साखरे, चॉद मुजावर, साहेबराव डुकरे, आष्विन जाधव, विजय राउत, पंजाबराव गायकवाड, शालीनीताई वानखेडे, छायाताई जाधव, पुष्पाताई गायकवाड, सुर्वणाताई इगळे, जिजाबाई जाधव, शीलाबाई गवई, पुनमताई पवार, वैषालीताई गवई, ललीताई खंदरलकर, नंदाताई देवकर, कैलास खराडे, दिपक थोरात, राहुल सवडतकर, गणेष गायकवाड, गजानन परिहार, संजय गिरी, सचिन शेटे, डिंगबार देषमाने, प्रकाष सपकाळ, बिदुसिंग इगळे, दिलीप पाटील, राजु सुरडकर, समाधान आकाळ, अजिम शेख शेलुद, मुकेष भंडारे, लक्ष्मण भिसे, जितु राणा, साहेबराव आंभोरे, स्वप्नील गवई, राजु जवंजाळ, प्रकाष तायडे, गणेष जवंजाळ, राम भुसारी, प्रकाष राठोड, प्रकाष चव्हाण, सुनिल पवार, अमोल मोरे, भास्कर चांदोरे, रफिक भाई, षिवा म्हस्के, अजाबराव इंगळे, पुरूषोत्तम, भारत गायकवाड, रामभाउ गायकवाड, साहेबराव साळवे, बंडु तरळकर, भास्कर धमक, संतोष क-हाडे, गजानन वांजोळ, चंद्रभान परीहार, दिलीप चवरे, शुभम बुरकुल, रविंद्र परीहार, विष्वनाथ देषमाने, मदनराव म्हस्के, सागर खरात, दत्ता करवंदे, तुषार पाटील, ईलीयाससेठ, वसंता नारगळ, सोहराब सैयद, एन.टी. भुसारी,  बळीराम इंगळे, अन्सार सैयद, राजु शेख, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरीकांची व यांच्यासह कॉग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी एन.एस.यु.आय. माजी तालुका अध्यक्ष स्व. प्रसाद ठेंग यास आदराजंली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विष्णु पाटील कुळसुंदर यांनी तर आभार प्रदर्शन अतहरोद्यीन काझी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!