चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – आजकाल शिक्षकांना विद्यादानाशिवाय बरीच सरकारी कामे करावी लागतात हे आपण पहातो. तरीही काही शिक्षक हे सर्वच कामे निष्ठेने, कष्टाने तर करतातच पण समाजाभिमुख राहूनही परीक्षा काळात अधिक चांगले काम करणार्या मेरा बु. येथील शिवाजी हायस्कूलच्या एका शिक्षकाचा मान्यवरांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
मेरा बुद्रूक येथील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख आणि पर्यवेक्षक सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थांच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरवात झाली होती, आणि परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाने अनेक शिक्षकाकडे परीक्षेची जबाबदारी सोपाविली होती. त्यामध्ये मेरा बु. येथे एकमेव मोठे हायस्कूल असल्याने अंढेरा, बेराळा या शाळेच्या शेकडो विद्यार्थांनी शांतेत परीक्षा दिली. परीक्षा दरम्यान शाळेवर कार्यरत असलेले बुधवत हे शाळेत ८, ९, १० या वर्गातील विद्यार्थांना गणित विषयाचे शिक्षणा बरोबर परीक्षा काळात लिपिकपदाचे आणि बैठक व्यवस्था चांगल्या प्रकारे सांभाळली. त्यामुळे अशा चांगले काम करणारे शिक्षक बुधवत यांचा मान्यवरांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. शिक्षकाचा मान्यवरांकडून सत्कार झाल्याने शिक्षक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी जिल्हा परिषदचे शिक्षण व बांधकाम विभागाचे माजी सभापती तथा शाळा समिती सदस्य विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, जिल्हास्तरीय दुष्काळ निवारण समितीचे सदस्य सुधीर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, सो. सा. अध्यक्ष भास्कर पाटील, हभप विजू पाटील, पत्रकार प्रताप मोरे, गुंजाळा माजी सरपंच दीपक केदार, ज्ञानेश्वर पाटील, सतीश पडघान, शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, पर्यवेक्षक सोळंकी, खरात सर, इंगळे, बुधवत सर, प्रशांत पडघान, हर्षल पडघान, मनोज पडघान, केदार सर, पवार सर, बोडखे सर, म्हस्के सर, पी के पडघान, सोळंकी मॅडम, पुंनकर मॅडम, नागरे मॅडम, अनिल जाधव आदींची उपस्थिती होती.