BULDHANAHead linesMaharashtraVidharbha

केंद्रप्रमुखांना मिळणार आता टॅबलेट; राज्य सरकारचा निर्णय

बुलढाणा (संजय निकाळजे) – समग्र शिक्षाअंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने जाहीर करून राज्यातील ६ हजार १७० केंद्रप्रमुखांना टॅबलेट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील १४२ केंद्रप्रमुखांना हे टॅबलेट मिळणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या आणि अनुदानित शाळांच्या शिक्षणाचा दर्जा वाढविण्याची मुख्य जबाबदारी सांभाळणार्‍या केंद्रप्रमुखांना टॅबलेट वाटपाचा हा निर्णय शासनाने नुकताच घेण्यात आला आहे. राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थित टिकविणे व शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याकरिता ४ हजार ८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्रप्रमुखाचे पद निश्चित करण्यात आले आहे. या केंद्रप्रमुखांना शाळांची माहिती गोळा करण्यास, शासकीय योजनांचा प्रचार करण्यासाठी आता टॅबलेटची मदत होणार आहे. यामुळे माहिती संकलन आणि प्रचार प्रचाराच्या कामांना गती येण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रात वर्तविली जात आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यामध्ये या टॅबलेटचे वाटप होणार असून, त्यामध्ये अकोला ९७, अमरावती १७५, छत्रपती संभाजीनगर २१०, अहमदनगर २९०, बीड २०३, भंडारा ८०, बुलढाणा १४२, चंद्रपूर १५०, धुळे १०८, गडचिरोली १३२, गोंदिया एक, हिंगोली ८५, जळगाव १८४, जालना १४२, कोल्हापूर २१७, लातूर १६३, मुंबई १८५, नागपूर १९९, नांदेड २३३, नंदुरबार ११४, नाशिक ३१३, उस्मानाबाद ११५, पालघर १८१, परभणी ११४, पुणे ३७५, रायगड २२८, रत्नागिरी २५२, सांगली १६५, सातारा २३२ , सोलापूर २८०, सिंधुदुर्ग १४४, ठाणे ११८, वर्धा ८८, वाशिम ७८ आणि यवतमाळ २०८ या संख्येनुसार जिल्हा वाईज हे टॅबलेट मिळणार आहेत.


निर्णय स्वागतार्ह मात्र रिक्त पदे भरणे गरजेचे!
केंद्रप्रमुखांना टॅबलेट देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र केंद्रप्रमुखांची रिक्त असलेली पदे भरणेही तेवढेच गरजेचे आहे. बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास जवळपास ७० ते ७५ टक्के केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. एका केंद्रप्रमुखांना दोन ते तीन केंद्राचा प्रभार सांभाळावा लागत आहे. काही ठिकाणचे प्रभार तर मुख्याध्यापकाकडे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शैक्षणिक दर्जा कसा सुधरेल? हा देखील प्रश्न उपस्थित होतो.
– पी. सी. पवार, केंद्रप्रमुख, चिंचोली बोरे, जि.बुलढाणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!