मलकापूर पांग्रा (डॉ. गंगाराम उबाळे) – डॉ. शशिकांत खेडेकर हेच २०२४ मध्ये सिंदखेडराजा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार बनतील, अशी ग्वाही शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संपर्कप्रमुख तसेच खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली. सिंदखेडराजा तालुख्यातील झोटिंगा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा व नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खा. जाधव बोलत होते.
खा. जाधव यांनी आपल्या भाषणात सिंदखेडराजा विधानसभेचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हेच उद्याचे भावी आमदार असतील, यामध्ये कोणीही शंका करू नये, असा आत्मविश्वास व्यक्त करताच, खेडेकर यांच्या कार्यकर्त्याच्या चेहर्यावर आनंद दिसून आला, व सर्व उद्याच्या विधानसभा तयारी लागताना दिसून येत आहे. या शिवसेना कार्यकर्त्या मेळाव्यासाठी मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, युवा सेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, उपजिल्हाप्रमुख शिवसेना बाबुराव मोरे, तालुकाप्रमुख वैभव देशमुख, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख आदित्य काटे, शिवाभाऊ ठाकरे, योगेश जाधव, आतिश तायडे, संदीप मगर, राहुल काबरा, अशोक कायंदे, बबन जायभाये, प्रवीण गीते, रवि वायाळ, अविदास बंगाळे, शुभम पावरे, गोपी काळे, किरण काळे, सुनिल टाले, बंडूभाऊ उगले सरपंच मलकापूर पांगरा, अमोल देशमुख, बळीभाऊ उगले आदींसह ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी झोटिंगा गावातील शिवसैनिकांनी व सर्वांनी परिश्रम घेतले होते.
डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेडराजा मतदारसंघात चांगलीच राजकीय मोर्चेबांधणी केली असून, गावोगावी हक्काचे कार्यकर्ते तयार करण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी त्यांनी विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता. आता भाजप व शिंदे गट मिळून पुन्हा एकदा खेडेकर हे डॉ. शिंगणे यांच्या पराभवासाठी सज्ज झाले आहेत. या मतदारसंघात डॉ. शिंगणे यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अनेक गावांत विकासकामे करण्याचे आश्वासन शिंगणे यांनी दिले होते, पण ते पूर्ण केले नाही. पाणी, रस्ते यांची समस्या गंभीर आहे. नुकतेच, चिखली तालुक्यातील परंतु, सिंदखेडराजा मतदारसंघातील असलेल्या १९ गावांतील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच, उपसरपंच व माजी सरपंचांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मिसाळवाडी येथील स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवन, गावजोड रस्ता, तसेच अमोना, शेळगाव आटोळ, इसरूळ, मंगरूळ, अंचरवाडी, पिंपळवाडी या गावांतील विकासकामांसाठीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कामे करून देण्याचे आश्वासन डॉ. खेडेकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना दिलेले आहे. त्यामुळे डॉ. शिंगणे यांना जोरदार शह मिळणार असल्याचे राजकीय संकेत प्राप्त झालेले आहेत.
—————-