बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – चिखलीचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी मागण्यांची पूर्तता करतो, असे लेखी आश्वासन देऊन उपोषण सोड़विले. परंतु मागण्यांची पूर्तता केली नाही. एक प्रकारचे उपोषण बेदखल केले, असा आरोप करत आता याच मागण्या घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा भीमशक्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा काँग्रेसचे सर्कल प्रमुख मुकेश जनार्दन भंड़ारे व इतरांनी दिला आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांच्याच उपस्थितीत निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, चिखली तालुक्यातील उदयनगर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंर्तगत येणार्या गावांतील विविध लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी आम्ही २० मार्चरोजी आमरण उपोषण केले, तेव्हा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे यांनी १५ दिवसांत समस्या मार्गी लावतो, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु अजूनही लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नाही, तसेच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. तरी आपल्या स्तरावरून संबंधितावर कारवाई करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर १७ एप्रिलरोजी आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
हे निवेदन देतेप्रसंगी यावेळी काँग्रेसचे जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष एजाज मंत्री, सर्कल प्रमुख फयाज भाई, महादेव तोंड़े, गणेश पिंपळे, तुळशिदास ड़गड़ाळे, रविंद्र वानखेडे, मनोज बरगट, बबलु मानमोड़े, उध्दव साठे, गोपाल राठोड, विष्णू जाधव आदि उपस्थित होते.
Leave a Reply