मलकापूर पांग्रा ( प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा या गावामध्ये माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त झोटिंगा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी पंचायत समिती सभापती नाथाभाऊ दराडे व गावकर्यांच्यावतीने क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचे आयोजन केले आहे. तब्बल ६३ हजार रुपयाची जंगी लूट असून, झोटिंगा येथील नाथाभाऊ दराडे, रामभाऊ दराडे, सुभाषभाऊ केदार यांच्यावतीने हे सामने ठेवण्यात आले होते. उद्या, दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी अंतिम सामना असून, आज सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सामन्याला भेट देऊन क्रिकेट खेळाडूंचा उत्साह वाढवला.
या निमित्त आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी भाग घ्यावा, असे मार्गदर्शन आ. डॉ. शिंगणे यांनी करत, यावेळी खेळाडू व तरुणांना मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच, याप्रसंगी पंचायत समिती सदस्य नाथाभाऊ दराडे यांचा सत्कारदेखील आमदारांच्याहस्ते करण्यात आला. झोटिंगा ग्रामपंचायतीने तरुणांसाठी गावामध्ये झोटुबा महाराज क्रीडा संकुलन मैदान तयार केले असून, मैदानाबद्दल आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी गावकर्यांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्य मुंढे सर, सुभाष केदार, मदन वाघ, सरपंच अशोक वाघ, उपसरपंचपती अरुण खरात, झोटूबा महाराज नवयुग क्रीडा मंडळाचे सर्व सभासद व ग्रामस्थांची उपस्थिती होती.