Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

‘झेडपी’च्या समाजकल्याण विभागाने वाटप केला ४९ कोटींचा निधी

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सुमारे ५४ कोटी ४८ लाख रूपये इतका निधी मिळाला होता. त्यातील चालू वर्षी विविध विकास कामांसाठी सर्व तालुक्यांतून प्राप्त प्रस्तावाचा विचार करून जवळपास ४९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे मागासर्गीय वस्त्यांचे चित्र आता बदलता आहे. सुरूवातीला शासन निर्णयाच्या आधारे १ हजार २४६ मागास वस्त्यांची निवड करण्यात आली. या कामांना ९० टक्के प्रमाणे ४९ कोटी ०३ लाख रूपये इतका निधी देण्यात आला.

या योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पंचवार्षिक आराखड्यातून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये प्राधान्याने रस्ते, भूमिगत गटारी, नवीन समाजमंदिर, जुने समाजमंदिर दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक वस्त्यांना विजेची सोय करणे, पाणीपुरवठा आदी कामे घेण्यात आलेली आहेत. तेथील स्थानिक जनतेच्या गरजेचा विचार करुन मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात या निधीचे वाटप करण्यात आले आहे.


झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय जनतेला मोठ्या प्रमाणात लाभ देण्यासाठी व विकासकामे पारदर्शी होण्यासाठी नियोजन करता आले.
– सुनिल खमितकर, समाजकल्याण अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!