बुलढाणा (खास प्रतिनिधी) – राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांना बेस्ट चेअरमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील श्रीकृष्ण लॉन्स येथे २४ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम सहकार सक्षम महिला पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांना बेस्ट चेअरमन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, अभिनेत्री आशाताई शेलार, गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनात संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके उत्तम प्रकारे संस्थेचा कारभार सांभाळत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने बेस्ट चेअरमन म्हणून त्यांची निवड केली. यापुर्वी संस्थेला फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे च्यावतीने सहकार गौरव अंतर्गत सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार मिळालेला आहे.