बुलढाणा (संजय निकाळजे) – जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांची बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर बाळू रुस्तुम खरात यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे. या अगोदर ते शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यरत होते. विशेष म्हणजे, ते बुलढाणा जिल्ह्यातीलच मातृतीर्थ शिंदखेडराज्याचे सुपुत्र आहेत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक नियुक्ती ३६ २१/ प्र. क्र. ८५/ प्रशा २ मंत्रालय मुंबई, २१ मार्च २०२३ च्या पत्रानुसार त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती पत्रामध्ये महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे विनियमन शासकीय कर्तव्य पार पाडताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ दि एक जुलै २००६ पासून अमलात आले आहेत. सदर अधिनियमातील कलम ४४ (२) व कलम ४५ मधील तरतुदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकार्याच्या लगत नंतरच्या प्राधिकार्याच्या पूर्ण मान्यतेने विनंतीवरून पदस्थापना करण्यात येत आहे. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या आदेशाप्रमाणे बदली झालेले अधिकारी विहित कालावधीत दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील, याची खातरजमा करावी व याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. सदर शासन निर्णयाचे पत्र महाराष्ट्र शासनाचे उपसचिव टी.वा.करपते यांचे सहीने काढण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी बाळू खरात हे बुलढाणा जिल्ह्यातीलच मातृतीर्थ सिंदखेड राजाचे सुपुत्र आहेत हे विशेष..!