सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पत्रकाराच्या समस्येला वाचा फोडणारी एकमेव संघटन म्हणजेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ होय. या संघटनेची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी घाटावर प्रताप मोरे यांनी जिल्हाध्यक्षपदाचे हातामध्ये सूत्र घेताच ग्रामीण भागातील पत्रकारांना वाव मिळावा यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे नवनियुक्त पदाधिकार्यांच्या नियुक्ती त्यांनी जाहीर केले आहेत. यामध्ये सिंदखेडराजा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार देविदास पांचाळ सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक १३ मार्च रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे यांच्या हस्ते पंचाळ सर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर नियुक्ती ही केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, युसुफ खान केंद्रीय कार्याध्यक्ष, सुरेश साबळे केंद्रीय महासचिव, कैलास बापू देशमुख प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशावरून बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रतापराव मोरे यांनी केली आहे. या निवडीमुळे पंचाळ सर यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.
——————