बुलढाणा (खास प्रतिनिधी) – मेहकर तालुक्यातील मोळा फाटा ते खाजापिया मस्जीदजवळील २७५ फुट झालेल्या रस्त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करीत कामाची चौकशी करण्याची मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीमीन तर्पेâ करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले.
मेहकर तालुक्यातील मोळा रोडचे काम बर्याच प्रमाणात पूर्ण झालेले असून, रोडच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम सध्या सुरु आहे. सदर काम २७५ फुटापर्यंत पूर्ण झालेले आहे. पूर्ण झालेल्या रोडवर आत्ताच खड्डे पडत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर रोडचे काम करतांना सिमेंटचा वापर हा अतिशय कमी प्रमाणात झाला आहे. तसेच सदर रस्त्यावर नियमीत पाणीसुद्धा मारलेले नाही. त्यामुळे अवघ्या २७५ फुटाच्या रस्त्यावर राजश्री शाळेजवळ जवळपास ५ ते ६ ठिकाणी खड्डे पडलेले आहे. त्यामुळे नागरिकांना रहदारी अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहे. तरी झालेल्या रोडमधील निकृष्ट कामाची चौकशी करावी, तोपर्यंत कंत्राटदाराला कोणतीही देयक अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी एका निवेदनातून तालुकाध्यक्ष रहेमान खान, शोएब अली, अफरोज अहेमद, मोहम्मद इम्रान, जफर शाह, शे. जुनेद, मो. सलमान यांनी केली आहे.