BULDHANAVidharbha

सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्त्यांचे भाग्य उजळले; २७.८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. या रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागांना रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. जवळपास १५० कोटी रुपयांचे प्रस्ताव संबधित विभागाकडून शासन दरबारी दाखल करण्यात आले होते. पाठपुराव्यानंतर अर्थसंकल्पात रस्त्यासाठी २७.८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघातील मंजूर झालेल्या रस्तेकामांमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगाव चीलमखाँ रस्त्याकरीता ३२४.२२ लाख रुपये, राज्य मार्ग ५१ ते बामखेड रस्त्याकरिता २५०.२० लाख रुपये, सिंदखेडराजा तालुक्यातील प्रजीमा ३७ ते साठेगाव ता. हद्द रस्त्याकरिता ४३४.७७ लाख रुपये तसेच राज्य मार्ग २२२ ते रताळी रस्त्याकरीता ४२९.१० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मलगी – इसरुळ देऊळगांव मही – दिग्रस – खैरव -वाकद – मलकापुर पांग्रा रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करणे करीता ५५०.०० लाख रुपये, अमोना – देऊळगांव धनगर – भरोसा – मेरा बु – मेरा खु-शेंदुर्जन रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करणे करीता २००.०० लाख रुपये, राज्यमार्ग-५१ ते जऊळका – पिंपळगांवकुडा ते लिंगा (देवगड) रुम्हणा सोयंदेव खेरगड धानोरा बोरखेडी जिल्हा रस्ता प्र.जि.मा. मजबुतीकरणासह सुधारणा करणे करीता १५०.०० लाख रुपये, मलगी- इसरुळ- देऊळगांव मही – दिग्रस – खेरव- वाकद- मलकापुर पांग्रा रस्ता प्र.जि.मा. मध्ये संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे करीता १५०.०० लाख रुपये, अमोना – देऊळगांव धनगर- भरोसा- मेरा बु, मेरा खु.- शेंदुर्जन रस्ता मजबुतीकरणासह सुधारणा करणे करीता १५०.०० लाख रुपये, अंत्रा खेडेकर- गुंजाळा मध्ये रस्त्याची सुधारणा करणे करीता १५०.०० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते तयार होऊन ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
———————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!