BULDHANAVidharbha

रक्तदाता हाच खरा देवदूत!; संदीपदादा शेळके यांचा रक्तपेढी उभारण्याचा संकल्प!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – माणसाने सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावलेत.  शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात, परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र अद्याप आत्मसात केलेले नाही, त्यामुळेच स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे ठरते ‘रक्तदाता’ हाच खरा देवदूत ठरतो. त्यामुळे दिवसागणिक रक्तदानाची भासणारी गरज काही प्रमाणात का होईना पूर्ण करण्यासाठी या रक्तदानाच्या तुटवड्यावर संदीप दादा शेळके यांनी निदान म्हणून राजर्षी शाहू परिवार रक्तदानपेढी कार्यान्वित करणार असल्याचा संकल्प आज गर्दे हॉलमधील अभिष्टचिंतन सोहळ्यात जाहीर केला.

स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आज १३ मार्च रोजी आयोजित त्यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. यावेळी अभिता कंपनीचे संस्थापक तथा सीईओ सुनील शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, डोंगरखंडाळाचे उपसरपंच श्याम पाटील सावळे, हभप ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर, दीपक महाराज सावळे, शैलेशकुमार काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संदीपदादा शेळके म्हणाले, उन्हाळयात रक्ताची जास्त गरज भासते. मात्र त्यातुलनेत रक्त उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊन राजर्षी शाहू परिवार आणि राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला युवकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शिबिरातून तीन हजार रक्त पिशव्या संकलित झाल्या. गरजू रुग्णांना याचा फायदा होईल. शिबिरात सहभागी झालेल्या तीन हजार रक्तदात्यांचे त्यांनी आभार मानले. समाजाची रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तपेढी उभारण्याची त्यांनी घोषणा केली.

दरम्यान सोमवारी रक्तदान शिबिर पंधरवड्याचा समारोप झाला. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. पोलीस विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. कवी, लेखक विनोद बोरे लिखित युवा ऊर्जास्रोत पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. संचलन शैलेशकुमार काकडे यांनी केले. आभार नितीन उबाळे यांनी मानले.

कुंवरदेव येथील महिलांचा अनोखा नजराणा

जळगाव जामोद तालुक्यातील कुंवरदेव हे गाव राजर्षी शाहू परिवाराने दत्तक घेतले आहे. येथील महिलांनी सोमवारी संदीपदादा शेळके यांचे अनोख्या पद्धतीने अभिष्टचिंतन केले. कलिंगड कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. पळसाच्या फुलांचा हार घालून महिलांनी स्वागत केले. बाजरीची, मक्याची भाकरीही त्यांनी आणली होती. आपल्या देशाची कृषिप्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीनुसार कुंवरदेव येथील महिलांनी दिलेली भेट अनोखी ठरली.


लक्षवेधी निघाली दुचाकी रॅली

संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी ८ वाजता डोंगरखंडाळा ते बुलडाणा दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत जवळपास दोनशेवर दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला. स्वतः संदीपदादा शेळके बुलेटवर रॅलीत सहभागी झाले होते. बुलडाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौकातूनही रॅली काढण्यात आली. या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!