मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये जसे पंचायत समिती कार्यालय असेल, तहसील कार्यालय असतील व इतर शासकीय कार्यालय असतील, अशा ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त दूरहून आलेल्या नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची सुविधासुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांची हेळसांड होते. याकडे कुणाचे लक्ष नाही, त्यामुळे ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली व विदर्भ उपाध्यक्ष सचिन खंडारे, विदर्भ मुख्य संघटक सुनील अंभोरे, विदर्भ संघटक राजीव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्राहक संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाराम उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० मार्च २०२३ रोजी मागण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये नमूद आहे, की बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कुठल्याही प्रकारचे स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी निदान माणुसकीचा धर्म जोपासत तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयामध्ये निदान नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची तरी व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे अनेक महिला व पुरुष कामानिमित्त तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयामध्ये येत असतात, त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचे स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत, त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छतागृहे व पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
यावेळी निवेदन देताना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे विदर्भ उपाध्यक्ष सचिन खंडारे, विदर्भाचे मुख्य संघटक सुनीलभाऊ अंभोरे, विदर्भ संघटक राजू जाधव, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गंगाराम उबाळे, बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष किरणताई वाघ, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हा विधी सल्लागार एडवोकेट लुकमान शेख, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे महिला विधी सल्लागार एडवोकेट वर्षाताई कंकाळ, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष माजी पोलीस अधिकारी अशोकराव काकडे, बुलढाणा जिल्हा सचिव कैलास आंधळे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब वायाळ, सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष संजय उबाळे, चिखली तालुका अध्यक्ष ज्ञानदेव वायाळ, खामगाव तालुका अध्यक्ष पांडुरंग जानोकार, मेहकर तालुका अध्यक्ष परमेश्वर पवार, तालुका सचिव सिंदखेडराजा विनोद खजुरे, सिंदखेडराजा तालुका संघटक विठ्ठल राठोड, व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.