बुलढाणा (प्रशांत खंडारे) – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये एकूण २९२ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये प्रत्यक्ष निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च ३० दिवसात सादर करणे बंधनकारक आहे. मात्र त्यांनी खर्च सादर न केल्याने त्यांना आता ५ वर्षासाठी ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी, निवडणूक लढविण्यासाठी निरर्ह घोषित करण्यात आले आहे, असा जिल्हाधिकार्यांनी आदेश काढला आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये माहे जानेवारी-२२ ते डिसेंबर-२२ या कालावधीमध्ये एकूण २९२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. सदर ग्रामपंचायतीमध्ये ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणुक लढविलेली अशा उमेदवारांनी निवडणूक खर्च ३० दिवसामध्ये सादर करणे बंधनकारक आहे. माहे जानेवारी-२२ ते डिसेंबर-२२ या कालावधीमध्ये एकूण ६९० उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी यांनी २४ फेब्रुवारीला आदेश दिला आहे. या आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यासाठी निरर्ह घोषित करण्यात आले आहेत. खर्च सादर न केलेल्या तालुकानिहाय उमेदवारांची सदस्य संख्या खालील प्रमाणे आहे. बुलढाणा ५६, चिखली २७, देऊळगाव राजा ६५, सिंदखेड राजा १३३, मेहकर ६९, लोणार १४६, जळगाव जामोद १३, संग्रामपूर ३९, नांदुरा ४९, मोताळा २८, मलकापूर १६, खामगाव ४३, शेगाव ६ असे एकूण ६९० उमेदवारांची संख्या आहे.