सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषदेला मागील वर्षी प्राप्त झालेल्या २२४ कोटीपैकी जवळपास १५८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरी उर्वरित निधी खर्च करण्यासाठी सध्या झेडपीच्या विभाग प्रमुखांची धावपळ सुरू आहे. हा निधी खर्च करण्यासाठी झेडपीचे सीईओ संदीप कोहिणकर हे मात्र अधिकार्यांना तंबी दिली आहे.
सन २०२१-२२ मधील हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु सध्या अनेक कामे सुरू आहेत तर कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे हा निधी मार्च अखेरपर्यंत जर का नाही खर्च केला तर तो शासनाला परत जाऊ शकतो. या हेतूने सध्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे वारंवार आढावा बैठक घेत आहेत. जेणेकरून शासनाकडे निधी परत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी बैठकीचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, समाज कल्याण विभाग निधी खर्चामध्ये टॉपला आहे तर त्यानंतर बांधकाम दोन आहे तर सर्वात निधी खर्च करण्यामध्ये कमीत कमी महिला बालकल्याण विभाग आहे महिला बालकल्याण विभागाचा केवळ ४२ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.
—————-
असा झाला विभाग निहाय खर्च
बांधकाम एक ५२ टक्के
बांधकाम दोन ७८ टक्के
लघुपाटबंधारे ६५ टक्के
ग्रामीण पाणीपुरवठा ६९ टक्के
ग्रामपंचायत विभाग ७५ टक्के
आरोग्य विभाग ५७ टक्के
शिक्षण विभाग ७५ टक्के
समाज कल्याण ८८ टक्के
महिला बालकल्याण ४२ टक्के
पशुसंवर्धन ५४ टक्के
असे एकूण ६९ टक्के
———————-
मार्च पर्यंत २०२१- २२ मधील सर्व निधी खर्च करण्याचे आमचे नियोजन आहे. तशा प्रकारच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. जेणेकरून शासनाकडे निधी परत जाणार नाही यासाठी निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
– संदीप कोहिणकर, सीईओ, झेडपी
———————-