जानेफळ (अनिल मंजुळकर) – मेहकर तालुक्यातील सप्तऋषीपैकी तिसरे ठिकाण गौतमेश्वर संस्थान. गोमेधर गावातून निघणारी मिरवणूक, टाळ-मृदंगाच्या तालावर गौतमेश्वर संस्थानवर पार पडले महादेव-पार्वतीचे शुभमंगल . या सोहळ्याला अखंडितपणे १०५ वर्षाची परंपरा असून हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली.
डोंगराच्या कुशीत असलेल्या गौतमेश्वर संस्थानवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानचे अध्यक्ष विनोदराव होणे यांच्या घरापासून महादेव पार्वतीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. गावातून भव्य मिरवणूक काढून टाळ मृदंगाच्या तालावर विविध भक्ती गीतामध्ये तल्लीन होऊन पालखी संस्थानवर अकरा वाजता पोहोचली. तेथे विधिवत आरती, पूजा करण्यात आली. महादेव पार्वतीच्या सभोवताली गहू, तांदूळ, ज्वारी, उडीद, तूर, मुग, मसूर, तीळ या धान्याची राशी मांडल्या. जातात नंतर विवाह सोहळा पार पाडला. बरेच भाविक भक्त मुक्कामी असतात. दुपारी होणार्या महाप्रसादाला शिवभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष विनोद होणे, राजू होणे व इतर विश्वस्तांनी केले आहे.