आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील अलंकापुरी पंचक्रोशीतील विविध पुरातन शिव मंदिरांत महाशिवरात्र परंपरेने मोठ्या भक्तिमय उत्साहात धार्मिक मंगलमय वातावरणात महाशिवरात्र दिनी व्रत, उपवास करीत शिवभक्तांना सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांचे वतीने माऊली मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
महाशिवरात्री निमित्त आळंदी मधील पुरातन वैतागेश्वर मंदिरात देखील परंपरेने महाशिवरात साजरी करण्यात आली. येथे अतुल लोणकर यांचे वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. आळंदी पंचक्रोशीतील शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. माऊली मंदिरात हजारो भाविकांनी रांगा लावून श्रींचे दर्शन घेतले. आळंदी पंचक्रोशीतील शिवमंदिर श्री वाघेश्वर महाराज मंदिर, श्री नागेश्वर महाराज मंदिर, श्री धनेश्वर महाराज मंदिर, श्री चक्रेश्वर महाराज मंदिर, वडगाव घेनंद येथील पुरातन पांडव कालीन श्री बेली महादेव मंदिर आदी मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. तसेच येथील माऊली मंदिरात असणारे पुरातन श्री सिद्धेश्वराचे मंदिर, आळंदीतील सिध्दबेटातील शिव मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली होती. येथील मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलाला होता. शिवभक्तीमय वातावरण सर्वत्र पाहण्यास मिळाले. ने फुलून गेले होते. परिसरातील शिवमंदिरात भक्तांनी दिवसभर दर्शनासास गर्दी केली होती. माऊली मंदिरात भक्तांचा उत्साह होता.
भक्तांचे दर्शनाही व्यवस्था आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सेवक कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने उत्तम ठेवली. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना श्रींचे दर्शनाचा लाभ देण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. माऊली मंदिरात पहाटे श्रीना अभिषेख पूजा, महानैवेद्य, कीर्तन, ११ ब्रम्हवृंदांचे वतीने महाशिवरात्रीचा अभिषेक प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते होत आहे. सायंकाळी माऊली भक्त राहुल चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने १०३ लिटर मसाले दुध महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदी देवस्थान तर्फे देखील महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, ह. भ. प. तुकाराम महाराज ताजने, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, साईनाथ ताम्हाणे, संकेत वाघमारे, एम.डी. पाखरे, हिरामण तळेकर, शशिकांत बाबर, श्रीकृष्ण शिंदे, तुकाराम माने आदींसह भाविक उपस्थित होते.