BULDHANA

अबॅकस स्पर्धेतील गुणवंतांचे जयश्रीताई शेळके यांनी केले कौतुक

मोताळा : पुणे येथे नुकत्याच झालेल्या अबॅकस नॅशनल लेव्हल कॉम्पिटीशन स्पर्धेत मोताळा येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळविले. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक करून १८ फेब्रुवारी रोजी सत्कार केला.

पुणे येथे नुकतीच नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटीशन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मोताळा येथील पाच विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळविले. वेदिका राऊत हिने आठवा क्रमांक मिळवला. संस्कृती मुळे दहावा, आदिती मापारी अकरावा, अर्पिता धांडे तेरावा आणि अंजली जवरे या विद्यार्थिनीने चौदावा क्रमांक पटकावला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी सर्व गुणवंत विद्यार्थिनींची प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक केले. तसेच दिशा महिला अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेत त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रीराम बोदडे, मनोहर पाटील, शेख साबीर, रवींद्र राऊत, सागर सोनुने, विजय धांडे, योगेश महाजन, श्रीमती मुळे, श्रीमती मापारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!