ChikhaliVidharbha

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्यात पटकाविला प्रथम क्रमांक!

मेरा बुद्रूक (प्रतिनिधी) – गजानन उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबादचा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी सोहम विनोद सुरडकर याची नॅशनल गेम ट्रायल २०२३ युथ गेम्स कौन्सिल ऑफ इंडिया १७ वर्षे वयोगटातून शेगाव येथे झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला होता. शेगावच्या क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याने त्याची राज्यस्तरावर निवड झाली होती. ग्वालियर (मध्यप्रदेश) नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातून १०० मीटर धावणे ग्वालियर गोल्ड मेडलिस्ट राज्यस्तरीय स्पर्धेत सोहम विनोद सुरडकर याने प्रथम क्रमांक पटकावला.

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्यामधून प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे भोपाळला होऊ घातलेल्या इंटरनॅशनल स्पर्धेत त्याची निवड झाली. त्याच्या ह्या निवडीबद्दल गजानन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुगनचंद परदेशी, पर्यवेक्षक सरकटे सर भागवत सर, मेडल विभाग प्रमुख शंकर गोरे सर, क्रीडा शिक्षक इंगळे सर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याला शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले. इंटरनॅशनल स्पर्धेत त्याची निवड झाल्याने, चिखली तालुक्यातील भानखेड गावासह तालुक्यातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!