BULDHANAHead linesVidharbha

जीवन त्यांना कळले हो!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – दुचाकी अचानक मधात येते आणि ८ प्रवासी असलेला ऑटो पलटी होतो. जखमींचा आक्रोश सुन्न करतो. काळजाचा ठोका चुकतो. आपण जगू का? असा प्रश्नही जखमींच्या मनात उसळी घेतो. दरम्यान, मृत्युंजय गायकवाड हे रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचवितात आणि जखमींवर तात्काळ उपचाराची सुविधा रुग्णालयात आधीच करून ठेवतात. त्यामुळे उपचाराने ‘त्यांना जीवन म्हणजे काय? हे कळून चुकते!

होय ‘ऑटो पलटी होऊन ८ जखमी प्रवाशांना ‘जीवन कळाले!’ १६ फेब्रुवारीला मोताळा तालुक्यातील रोहिणखेड परिसरातील पोल्ट्री फार्मजवळ अचानक दुचाकी मधात आल्याने मोताळाकडे जाणारा ऑटो उलटला. या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले. यामध्ये रोहिणखेड येथील ६ तर २ प्रवासी इतर ठिकाणचे होते. अपघातानंतर जखमी वेदनेने विव्हळत होते. काहींच्या मनात ‘आता सर्व संपले’, असा विचार येऊन गेला. दरम्यान, या घटनेची माहिती मोताळा येथील स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह प्रसाद हुंबड, गणेश राजस यांनी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड यांना तात्काळ दिल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी तत्पूर्वीच सुविधा उपलब्ध करायचे सांगितले. दरम्यान, सर्व जखमींना उपचार सुरू झाले. आणि आता सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अर्षद, निलेश पाटील, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठारी यांच्यासह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!