– चिखलीच्या तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
चिखली (शहर प्रतिनिधी) – चिखली तहसील कार्यालय येथे रेशनकार्डच्या लहान-सहान कामासह इतर कामासाठी चलन व पावतीच्या नावाखाली जादा रक्कम अनधिकृत कर्मचारी उकळत असल्याची चर्चा महसूलसह संपूर्ण तालुक्यात होत आहे. त्यामुळे अनधिकृत कर्मचार्यांची हकालपट्टी करण्यासंदर्भात मानवता मागासवर्गीय सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था, चिखलीच्यावतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना तहसीलदार चिखली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. व हे अनधिकृत कर्मचारी तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
सविस्तर असे, की चिखली तहसील कार्यालयमध्ये जसे रेशनकार्ड विभागसह इतर विभागामध्ये कर्मचारी तुटवडा असल्यामुळे कोतवाल, शिपाई व इतर वर्ग चारचे कर्मचारी तथा इतर अनाधिकृत कर्मचारी यांची तहसीलच्या महत्वाच्या व जनहित विभागाच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु रेशन कार्ड विभागात सर्रास भोंगळ कारभार सुरु असून, रुपये तीने ते पाचशे रुपये चलन व पावतीच्या नावाखाली घेऊन रेशनकार्डचे छोटे मोठे उदा. नाव कमी करणे, नाव वाढवणे, दुय्यम प्रत तसेच नविन राशन कार्ड करीता रुपये दोन हजार ते तीन हजारापर्यंतची मागणी होत असल्याची चर्चा सध्या चिखली शहरासह तालुक्यात सुरु आहे. तसेच मागणी प्रमाणे रक्कम दिल्यास रेशनकार्डचे कामे तात्काळ होतात अन्यथा नियम दाखविण्यात येतात, किंवा कामाचा भडीमार असल्याचे सांगून पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी सांगुन जनसामान्यांना नाहक त्रास देण्याचे कृत्य होत असल्याने तहसील कार्यालय चिखलीच्या सर्व विभागासह रेशनकार्ड विभागातील अनधिकृत व बेकायदेशीर असलेले कर्मचारी यांच्यामुळे जनसामान्यांना होत असलेला नाहक त्रास टाळण्यासाठी संबधीतांची तात्काळ हाकलपट्टी करण्यात यावी, अन्यथा मानवता मागासवर्गीय सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था मं. चिखली र. नं. ४९३ च्या वतीने लोकशाही मार्गाने आमरण उपोषण किंवा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असा इशारासुध्दा निवेदनाव्दारे देण्यात आला. यावेळी मानवता मागासवर्गीय सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था मं. चिखलीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतभैया अ. डोंगरदिवे, सचिव सौ.रुपाली डोंगरदिवे, आशा कस्तुरे, पत्रकार प्रशांत जैवाळ, सौ उमा जैवाळ, रवि मगर, सिध्दार्थ वानखेडे, आकाश गवई, विशाल गवई, सुरेश गवई, रमेश गवई यांच्यासह ईतर उपस्थीत होते.