चिखली (प्रतिनिधी) – चिखली विधान सभा मतदार संघातील रस्ते, वीज पाणी आणि ईतर मूलभूत सुविधा देन्यासाठी अहोरात्र झटत असणाऱ्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या सोबतच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ना. मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग, महाराष्ट्र शासन आणि आमदार श्रीमती श्वेताताई महाले, चिखली मतदार संघ यांच्या मार्गदर्शना अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने दि. १६.०२.२०२३ रोजी वार गुरुवार ला स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तोरणवाडा रोड, उदयनगर (उंद्री), ता. चिखली, जि. बुलढाणा या ठिकाणी पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास १६ पेक्षा अधिक उद्योजकांनी त्यांच्याकडील ११७८ पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे टाटा, महिंद्रा, हिताची सारख्या नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजु व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवुन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुध्दा निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. टाटा सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.
इच्छुकांनी ऑलाईन नोंदणी करावी
या भव्य रोजगार मेळाव्यात स्पॉट नोकरी देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करने अनिवार्य असून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर https://jobfair.mysba.globalsapio.com/ व या लिंक वर नाव नोंदणी केलेल्या १० वी, १२ वी आय टी आय पदवीधर पुरुष / महिला उमेदवारांनी दि. १६.०२.२०२३ रोजी स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था तोरणवाडा रोड, उदयनगर (उंद्री), ता. चिखली, जि. बुलढाणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्याची संधीचा लाभ घ्यावा. पात्र, गरजु व नौकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा अर्ज करु शकतात. तरी दिनांक १६.०२.२०२३ रोजी वार गुरुवार ला स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तोरणवाडा रोड, उदयनगर (उंद्री), ता. चिखली, जि. बुलढाणा येथे आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १०.०० वा. उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनीधी समवेत मुखालत द्यावी व बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तोरणवाडा रोड, उदयनगर (उंद्री), यांनी एक प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.