चिखली (तालुका प्रतिनिधी) – सालाबादाप्रमाणे याहीवर्षी गुंजाळा येथे श्रींच्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होणार असून, महाप्रसादाचे आयोजन गजानन महाराज संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
गुंजाळा येथील गावकर्यांना संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे जावे लागत असे. त्यामध्ये वयोवृध्द, अंध अपंग, महिला पुरुषांना फार त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे लोकांना त्रास होवू नये आणि गावातच दर्शनाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने स्व.त्र्यबकराव कोंडू केदार यांच्या मुलासह नातवंडांनीं गावातील भाविक भक्तांसाठी गावाच्या हाकेच्या अंतरावर स्वत:च्या शेतात निसर्गमय वातावरणाच्या जागेवर मुख्य रस्त्यावर भव्यदिव्य असे मंदीराचे बाधकाम करुन संत गजानन महाराज मूर्तीची स्थापना केली. चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या एक ते दीड हजार लोसंख्येचे गुंजाळा गाव आहे. या गावांमध्ये ८ वर्षा पूर्वी गावालगत अथवा गावाच्या आजूबाजूला कुठेही श्रीचे मंदीर नसल्याने भाविक भक्तांना दरवर्षी दर्शनासाठी शेगाव येथे जाणे येणे असे २०० किलोमिटर अंतरावर जावून दर्शन घ्यावे लागत होते. त्यामुळे स्व. त्रंबकराव कोडू केदार यांच्या मुलांनी अथवा नातवंडांनी गावालगत काही हाकेच्या अंतरावर स्वत:च्या शेतात भव्यदिव्य श्रीच्या मंदिराची स्थापना केली आणि गेल्या ८ वर्षा पासून सतत खंड न पडता श्री च्यां प्रगट दिनानिमित्त परिसरातील भाविक भक्तांसाठी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यावर्षी सुध्दा सालाबादा प्रमाणे श्री च्या प्रगटदिनी दि. १३ फेब्रुवारी रोजी श्री गजानन विजयग्रंथाचे सामूहिक पारायण वाचन, तसेच सकाळी ८ वाजता गावातून श्री च्या प्रतिमेची भव्यदिव्य दिंडी काढण्यात येणार आहे. गावातून श्रीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार असल्याने महिलावर्ग आपआपल्या घरापुढे सडा सारवण, रांगोळी, काढून दिंडीतील भाविक भक्तांना कुंकू टिळा लावून ओवाळणी करणार आहेत. दुपार पासून तर कार्यक्रम संपेपर्यत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शेकडो भाविक भक्तांनी लाभ घेवून महाप्रसादाचा आस्वाद घावा, असे गजानन महाराज संस्थानच्यावतीने आवाहन करण्यात आलें आहे.