Breaking newsBULDHANAHead lines

शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा गमिनी कावा; पोलिसांच्या वेशात आले, अंगावर रॉकेल ओतून घेतले!

– साध्या वेशातील पोलिसांनी झडप घालून रविकांत तुपकरांना पकडल्याने अनर्थ टळला
– जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या :  सोयाबीन, कापसाला भाव व शेतकर्‍यांचा पीकविमा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा तुपकरांचा इशारा


Update :

  • बळाचा वापर करून पोलिसांनी तुपकरांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न..!
    शेतक-यांवर केला लाठीचार्ज.. तुपकरांसह त्यांच्या पत्नीलाही घेतले ताब्यात…
  • सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून केला पोलीसांनी लाठीचार्ज -रविकांत तुपकरांचा आरोप..
  • बुलढाणा पोलीस स्टेशनला रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरू..
  • बुलढाणा पोलीस प्रशासनाचा आणि राज्य शासनाचा जाहीर निषेध..

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकर्‍यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत, एक तर कापूस व सोयाबीनला भाव द्या, नाही तर आम्हाला मरू द्या, किंवा गोळ्या घालून मारून टाका, असे सांगत, आत्मदहन करण्याचा इशारा देणार्‍या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज दुपारी पोलिसांना चकवा देत, पोलिसांच्या वेशात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रगट होत, अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना झडप घालून तातडीने ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी शेतकरी व पोलिस यांच्यात चांगलीच ताणाताणी उडाली होती. तुपकर यांच्या गनिमी काव्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली असून, आत्मदहन आंदोलनातून काही दुर्देवी घटना न घडल्याने राज्य सरकारने सुटकेचा निश्वास टाकला आहे. आंदोलनानंतर तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडत, राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. हे सरकार फसवे असून, शेतकरीप्रश्नी वेळकाढूपणा करत आहे. अधिकारी हे लाेकप्रतिनिधीचे चमचे असल्याचा आराेपही त्यांनी केला. मागण्या मान्य हाेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा तुपकर यांनी दिला.

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावरुन स्वभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर हे पोलिसांच्या वेशात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, साध्या वेशातील पोलिसांनी तातडीने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले. याप्रसंगी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकर्‍यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी आरोप केलेला आहे. हजारो शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासने दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. ७० ते ८० टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचे याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच अनेक शेतकर्‍यांना अद्याप पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याचेही ते म्हणाले.

एक तर आत्मदहन करु द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला, आता मागे हटणार नाही असा निर्धार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला होता. तसेच, ११ फेब्रुवारीला मुंबई किंवा बुलढाण्यात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. गेल्या चार दिवसांपासून ते भूमिगत झाल्याने मुंबई व बुलढाणा पोलिस त्यांच्या मागावर होते. तसेच, आज त्यांचे आंदोलन होऊ नये यासाठी पोलिस प्रयत्नशील होते. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येऊन आंदोलन छेडले. यावेळी तुपकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी होते. याबाबत बुलढाणा पोलिस पुढील कार्यवाही करत होते.


कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेलं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर भूमिगत झाले होते. आज आंदोलन सुरू होताच तुपकर अचानक प्रकटले. पोलिसांच्या वेशात आलेल्या तुपकर यांनी आंदोलनात येऊन अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात सहभागी झालेल्या आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळळा. परंतु, तुपकर यांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड, संताप आणि तळतळाट निर्माण झाला आहे.

Tupakar Live

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!