चिखली (तालुका प्रतिनिधी) – भारतातील गावे सुखी झाली तरच देश समृद्ध होईल, या दूरदृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनची घोषणा केली, आणि माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघात जल जीवन मिशन गतिमान झाले. त्यामुळे चिखली विधानसभा मतदार संघातील १३८ पाणी पुरवठा योजनांच्या कामांसाठी १६४ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळवून घेतली. यामुळें गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून, गावे पाणीदार होण्या बरोबरच माय-बहिणींच्या डोक्यावरील हांडे उतरवून जाईल, असे प्रतिपादन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी करणखेड येथील पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी केले.
दि ९ फेब्रुवारी २०३३ रोजी करणखेड येथे १ कोटी ७० लक्ष ७७ हजार रुपये किमतीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आ. सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. करणखेड येथे ३०० लक्ष रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या भूमिपूजन सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वश्री बबनराव गिर्हे, अंकुशराव पाटील, कृष्णकुमार सपकाळ, ता. अध्यक्ष भाजपा, मा. सौ. अनिताताई गायकवाड सरपंच करणखेड, समाधान कणखर शेतकरी संघटना नेते, एकनाथ जाधव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, दासा पाटील कणखर नेते शेतकरी संघटना, शिवाजीबापू देशमुख उपजिल्हाप्रमुख शिवसेना, गजानन मोरे ता. प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना, विलास घोलप, शहरप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना, रामकृष्ण अंभोरे उपतालुका प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना, भास्करराव आडळकर भाजपा नेते, संतोष काळे पाटील, तालुका अध्यक्ष युमो चिखली, भारतमामा शेळके, विनोद सीताफले, वीरेंद्र वानखेडे, दत्तात्रय कणखर, अमोल पाटील, गणेश गायकवाड, लक्ष्मण शेळके, गजानन गायकवाड, अरुण पाटील, बाळू पाटील, प्रमोद खरात, वसंतभाऊ शेळके तथा भाजप पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी मंडळी व महिला भगिनी उपस्थित होत्या.