BULDHANAChikhali

आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघातील परंतु चिखली तालुक्यातील विविध जोडरस्त्यांचा ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजनेत समावेश!

चिखली (विनोद खोलगडे) – सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुरावा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिखली तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या मागणीमुळे चिखली तालुक्यातील विविध जोडरस्त्यांची ग्रामीण मार्ग म्हणून नव्याने समावेश झाला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. विकास मिसाळ यांनी दिली आहे. यामध्ये मंगरूळ ते शेळगाव आटोळ रस्ता, वसंत नगर जोड रस्ता, मिसाळवाडी ते शेळगाव आटोळ रस्ता, अंत्री खेडेकर ते तपोवन देवी मंदिर रस्ता आदी महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश असल्याचेही डॉ. मिसाळ म्हणाले.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना डॉ. विकास मिसाळ म्हणाले, की राज्य शासनाच्या रस्ते विकास योजनअंतर्गत ग्रामीण मार्ग म्हणून नोंद झालेल्या चिखली तालुक्यातील, परंतु सिंदखेडराजा मतदारसंघातील विविध जोडरस्त्यांचे ग्रामीण मार्ग म्हणुूा नोंद घेण्यात यावी, यासाठी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेवरून मी स्वतः डॉ. विकास मिसाळ शेळगाव आटोळ, राजीव जावळे कोनड, गजानन वायाळ मेरा बुद्रूक, अंकुश थूट्टे, भागवत थूट्टे, भरोसा, बाळू मिसाळ, शेनफड पाटील सुरूशे, देवानंद गवते मंगरूळ, उद्धव थुट्टे भरोसा, समाधान परिहार अंचरवाडी इत्यादी पदाधिकारी यांनी उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग बुलढाणा यांच्याकडे ग्रामपंचायतींच्या ठरावांसह प्रस्ताव सादर केले होते.

तसेच या संदर्भात तत्कालिन पालकमंत्री आ. डॉ. राजेन्द्र शिंगणे यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग बुलढाणा यांना रस्ते विकास योजनेत समाविष्ट नसलेल्या रस्त्याचे प्रस्ताव सदर ग्रामपंचायत यांच्याकडून मागून घ्यावेत, आणि जिल्हा परिषदेचा तसा ठराव मंजूर करून, मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने मतदारसंघातील त्या त्या गावातील जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव बांधकाम उपविभाग मार्फत कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांना पाठविले होते. त्यामुळे चिखली तालुक्यातील परंतु सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते विकास योजनेअंतर्गत समावेश झालेले रस्ते हे आमदार डॉ. राजेन्द्र शिंगणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेले आहेत, असेही डॉ. विकास मिसाळ यांनी सांगितले.


आ. डॉ. शिंगणे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेले रस्ते पुढील प्रमाणे – मनुबाई ते गुंजाळा रस्ता, अंचरवाडी ते डोड्रा रस्ता, अंचरवाडी ते गवळी बाबा रस्ता, अंचरवाडी ते भरोसा रस्ता, मंगरूळ ते शेळगाव अटोळ रस्ता, वसंत नगर जोड रस्ता, मिसाळवाडी ते शेळगाव अटोळ रस्ता, अंत्री खेडेकर ते तपोवन देवी मंदिर रस्ता, भरोसा ते काळोनावाडी रस्ता, कोनड ते येवता रस्ता, शेळगाव अटोळ ते अमोना रस्ता, मेरा बुद्रूक ते असोला रस्ता.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!