बुलढाणा (बाळू वानखेडे) – मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुराच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच माध्यमातून अनेक अंधांना या संस्थेने एक प्रकारे नवी नजर दिली आहे. याचाच एक भाग म्हणून आज मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे ग्रामपंचायतीच्यावतीने मोफत नेत्रतपासणी व मार्गदर्शन शिबिर पार पडले. त्याचा सुमारे दिडशे गरजु व अंधांनी लाभ घेतला.
तिरूपती बालाजी संस्थान नांदुराचे मोहनराव नारायणा नेत्रालयाचे वतीने जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही अनेक उपक्रम राबविले जातात. आज १० फेब्रुवारी रोजी देऊळगाव साकरशा येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील अंगणवाड़ी केंद्र येथे आयोजित शिबिराचे उदघाटन सेवानिवृत्त शिक्षक पाचपवार सर यांनी केले. यावेळी सरपंच संदीप अल्हाट, जेष्ठ पञकार बाळू वानखडे, ग्रा.पं. सदस्य रणजीत देशमुख, शेख अबरार, रामचंद्र चव्हाण, शे. गफ्फार आदि उपस्थित होते.
शिबिरात १५० रूग्णांची तपासणी मोहनराव नारायणा नेत्रालयाच्या ड़ॉ. तमन्या मधवाणी यांनी केली. यावेळी अल्पदरात चश्मेही देण्यात आले. मोहनराव नारायणा नेत्रालयामार्फत शिबिरात मोफत तपासणी करण्यात येते. तसेच अल्पदरात चश्मा व नेत्रशस्त्रक्रिया केली जाते. याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी मारोती देशमाने यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना केले.