BULDHANAMEHAKARVidharbha

हिवरा आश्रम येथे भीषण अपघात, युवक ठार

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील हिवरा आश्रम येथे झालेल्या भीषण अपघातात युवकाचा औरंगाबादला उपचारार्थ नेत असताना दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा युवक हिवरा आश्रम फाट्यावर दुचाकीवरून पडल्याचे व त्याला एका टेम्पोने उडविल्याचे सीसीटीव्हीत दृश्य दिसत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, साखरखेर्डा पोलिसांत घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. हिवरा आश्रम येथेच राहणारा करण खडसे हा युवक हिवरा आश्रम फाट्यावर आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या अनुसार तो दुचाकीवरून पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर चिखलीकडून मेहकरकडे जाणार्‍या भरधाव टेम्पोने त्याला चिरडले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मेहकरला हलविण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने औरंगाबादला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने, त्याला औरंगाबादला नेण्यात येत असताना, सुलतानपूरच्या जवळपास प्रवासादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. करण हा छगनराव भुजबळ कला महाविद्यालयाचा विद्यार्थी हाेता. त्याच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, या मार्गावरील भरधाव वाहनांचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, या मार्गावर तातडीने हेवी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी पुढे आली आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!