बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ईयत्ता 12 वी 10 वी च्या परिक्षा आता काही दिवसावर येवून ठेपल्या आहेत व तयारीही झाली असेलच मात्र आता परीक्षेला सामोरे जाताना काय करावे लागेल, याविषयी बुलड़ाणा येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाड़े हे आज मार्गदर्शन करणार आहेत.
ईयत्ता 12 वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी पासुन सुरू होत आहे. तर ईयत्ता 10 वी चीही परिक्षा 2 मार्चपासून आहे.परिक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावे यासाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत घेतात प्रसंगी शिकवणी सुध्दा लावतात. पण परिक्षा देताना काहींची माञ तारांबळ होते.परिणामी ते आपल्या साध्या पर्यंत पोहोचण्यासाठी असमर्थ ठरतात व हताश होतात तर पास झाल्यावरही करिअर ची चिंता सतावतेच. विद्यार्थ्यांनी निःसंकोचपणे परिक्षा देण्यासाठी व करिअर घड़विण्यासाठी काय करावे यासाठी बुलड़ाणा येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाड़े यांचे परिक्षेला सामोरे जाताना या विषयावर आज 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 4 दरम्यान वेबीनार आयोजित केले आहे. यामध्ये ईयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणार आहेत.सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या कार्यालयाच्या https://youtu.be/kv097orkudg या युटयुब लिंक वरून करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबीनारला उपस्थित राहावे असे आवाहन कौस्तुभ दिघावकर संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी केले आहे.