चिखली (विशेष प्रतिनिधी) – देऊळगाव मही, ता. देऊळगावराजा परिसरातील गावातील चार शेतरस्ते व एका शेतरस्त्याच्या उपोषणासाठी सरपंच व ग्रामस्थ यांनी कपिला नदीपात्रात उपोषण करण्याबाबत, जिल्हाधिकारी बुलढाणा, यांना ८ फेब्रुवारी रोजी निवेदन सादर केले असून, १४ फेब्रुवारी रोजी उपोषण व काही ग्रामस्थ साखळी उपोषण करणार आहेत.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाडळी शिंदे येथील पाडळी शिवणी आरमाळ शेतरस्ता हा कपिला नदीपात्रातून शिवणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यावर शेतात जातांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच पाडळी खैरव शेतरस्त्या मिसिंग लिंक असून, संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच पाडळी वाकद हा शेतरस्त्याचे खडीकरण होण्यासाठी गावासाठी महत्वाचा असतांना नेहमीची येतो पावसाळा अशी अवस्था करण्यात येते व वेळ मारून नेण्यात येते. तसेच जिल्हा परिषद शाळेजवलील शेतरस्त्या यावर मानवी वस्तीसुद्धा असतांना पालकमंत्री पांणद रस्ते विकास विकास योजनेतून दोन किमी माती भराव करण्यात आला आहे, व एकदा ग्रामपंचायतीने सुद्धा मातीभराव केलेला असतांना तो मातोश्री पाणंद रस्ते यातून खडीकरणासाठी एक किमी प्रस्तावित असतांना नियोजनाचा अभाव असल्याने सदर काम करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. आदी मागण्यांसाठी येथील सरपंच सौ. उषाताई शिंदे, सरपंच पती प्रकाश शिंदे, माजी उपसरपंच मुरलीधर जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. रेखा शिंदे, गजानन शिंदे हे आमरण उपोषण कपिला नदीपात्रात १४ फेब्रुवारी रोजी करणार आहेत. यावेळी ३३ग्रामस्थ त्यांना साखळी उपोषण करून पाठिंबा देणार असून, एकंदरीत येथील शेतरस्त्याचा प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहे. निवेदन देतांना सरपंच पती प्रकाश शिंदे, माजी उपसरपंच मुरलीधर जाधव, गजानन तुकाराम शिंदे, दिनकर शिंदे, एकनाथ बाळकृष्ण शिंदे, रामेश्वर चोखोबा मोरे, गजानन रुस्तुम शिंदे आदी हजर होते.
शेतरस्ते शेतीसाठी महत्वाचे असतांना शासनाकडून पालकमंत्री पाणंद रस्ते व त्यानंतर मातोश्री पाणंद रस्ते विकास योजना सुरू करण्यात आली आहे. परंंतु, नियोजनाचा अभाव असल्याने ते दुर्लक्षित होत आहे व भरीस भर लोकप्रतिनिधीसुद्धा आश्वासने देऊन ते काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गांची अवस्था नेहमीची येतो पावसाळ्या अशी होत आहे, हे दुर्दैव शेतकरीवर्गांचे आहे एवढे मात्र खरे!