चिखली (तालुका प्रतिनिधी) – स्नेहसंमेलन म्हणजे केवळ नृत्य असा मर्यादित विचार न करता ते अधिक वैशिष्ट्यपूर्ण करण्याकडे कल असतो. अनेक स्नेहसंमेलनांमधून शिक्षकांची कलात्मकता, सृजन आणि विद्यार्थ्यांनी त्याला दिलेली साथ याचा सुरेख संगम अनुभवता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ म्हणजे शाळेचं स्नेहसंमेलन असते, मार्गदर्शन सभापती मखाजी साळवे यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी केले.
चंदनपूर येथील १ ते ७ पर्यत असलेल्या जि. प. शाळेचे स्नेसंमेलन शाळेचे सभापती मखाजी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने रंगमंचाची सजावट शाळेच्या शिक्षकांनी मंचाच्या पडद्यावर आशयपूर्ण वाक्य लिहिली होती. या स्नेहसंमेलनात नृत्य, घुमर नृत्य, शेतकरी नृत्य असे बहारदार नृत्याचे कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थांच्या विविध नृत्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
गीतावरच्या नृत्यात रंगीबेरंगी, हिरव्या, लाल, काळ्या आणि पांढर्या पेहरावामधून चिमुकल्यांनी प्रेषकांची मने जिंकत होती. एकएक नृत्य होताच उपस्थित प्रेषक एकमेकाची स्पर्धा करीत हजारो रुपये बक्षीस देत होते. स्नेहसंमेलनाचा आनंद घेण्यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, पत्रकार प्रताप मोरे, कैलास आंधळे, आजी माजी पदाधिकारी, इंगळे दुकानदार, तथा मोठ्या संख्येने तरुणांपासून तर वयोवृध्द महिला पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. या स्नेसंमेलनाचे सूत्रसंचालन शिक्षक गजानन पडघान यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक यांनी मानले.