– अदानी समूहाच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी जिल्हाभर एसबीआय व एलआयसीसमोर तीव्र आंदोलन
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे निवड़क उद्योगपतीवर मेहेरबान असल्याचा आरोप करत, अदानी समूहाच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी ७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ठीकठिकाणी एसबीआय व एलआयसीसमोर आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारने उदयोगपती मित्र अदानीच्या उदयोगसमुहात एसबीआय, एलआयसी व इतर संस्थांचा पैसा नियमबाह्य गुंतवणूक केल्याने जनतेचा पैसा बुड़ण्याची भीती असल्याचा आरोप करत सदर पैसा सुरक्षित राहावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये बुलढाणा येथे सुनील तायड़े व दत्ता काकस, मलकापूर येथे राजू पाटील व बंड़ू चौधरी, संग्रामपूर येथे प्रकाश देशमुख व संजय ढगे, नांदुरा येथे भगवान धांड़े व रवी राणे, शेगाव येथे कैलास देशमुख व विजय काटोले, खामगाव येथे माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सौ. सरस्वती खाचने, मनोज वानखड़े यांचे उपस्थितीत, लोणार येथे राजेश मापारी व शे. समद, देऊळगावराजा येथे गजानन काकड़ व विष्णू झोरे, मेहकर येथे पंकज हजारी तर सिदखेड़राजा येथे सिध्दार्थ जाधव यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, अशी माहिती श्लोकांद डांगे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
—————–