सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर
साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात देखील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी दिली.
पुढे बोलताना डॉ. सोनिया बागडे म्हणाल्या, सोलापूर जिल्हातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य संस्थास्तरावर रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीर, जागरुक पालक सदृढ बालक या मोहिमेचा शुभारंभ, माता सुरक्षित घर सुरक्षित या मोहिमेचा दुसरा टप्पा तसेच हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची घोषणा करणे आदी अभियानाची अमलबंजावणी 09 फेब्रुवारी 2023 पासुन करण्यात येत आहे. राज्य शासनामार्फत नवरात्री उत्सवानिमित्त 18 वर्षावरील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियानांचा पहिला टप्पा नुकताच संपलेला आहे. हा टप्पा पार करण्यासाठी जिल्हातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मधील वैद्यकीय अधिकारी यांचबरोबर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तंज्ञ डॉक्टर्स प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा सहभाग मोठया प्रमाणात होता. सदरील मोहिमेचा दुसरा टप्पा हा तीन पंधरवडात पार पडणार असल्यांची माहिती डॉ. सोनिया बागडे यांनी दिली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील हे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर विषयी बोलताना म्हणाले, मानवाकडुन मिळालेलेच रक्त मानवास उपयोगात येते रक्त हे तयार करता येत नाही. त्यामुळे शरीरात रक्तास अन्यसाधारण महत्व आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान असुन रक्ताअभावी कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये त्यासाठी रक्ताचा साठा रक्तपेढयामध्ये अवश्यक आहे. रस्त्यावरील अपघात, रक्तक्षय, प्रसुती दरम्यान होणारा रक्तस्त्राव आदी कारणामुळे रुग्णांना मृत्युस सामोरे जावे लागते. या शिबीराच्या माध्यमातून जिल्हातून जास्तीत जास्त रक्त संकलन करणेचा आरोग्य विभागाचा मानस असल्याचे स्षष्ट केले. याबरोबरच महाआरोग्य शिबीरमध्ये सर्वसाधारण रुग्ण, गरोदर माता, बालके यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणा साठी तंज्ञ डॉक्टारांची टीम व आरोग्य कर्मचारी ठिकठिकाणी तयार ठेवण्यात आले आहेत.
जागरूक पालक सदृढ बालक या मोहिमेचा शुभारंभ तालुक्यातून विविध शाळामधून करण्यात येणार आहे. तसेच आरोगय मंत्री यांच्या हस्ते मुंबई येथून ऑनलाईन हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची घोषणा करण्यात येणार आहे. तरी जिल्हातील जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य शिबीरांचा लाभ घेण्याचे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी केले. या पत्रकार परिषदेश पुणे परिमंडळ चे निरीक्षक डॉ. प्रदिप ढेले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी.दुधभाते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.