– १९६७ ते २०२२च्या बॅचचे माजी विद्यार्थी आले एकत्र; संस्थाध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे कल्पक नियोजन
चिखली (विशेष प्रतिनिधी) – डोंगर खंडाळा येथील श्री संभाजी राजे विद्यालयात जिल्ह्यातील सगळ्यात मोठा असा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या कल्पक विचारातून व प्राचार्य रविंद बरडे यांचे नियोजनातून या सुरेख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १९६७ पासून तर २०२२ पर्यंतचे हजारो माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. सर्वप्रथम शाळेची घंटा वाजवून ७५ वर्ष वयाचे जेष्ठांपासून तर २० वर्ष वयाचे तरूण माजी विद्यार्थी रांगेत उभे राहिले व राष्ट्रगीताने या समारंभाची सुरूवात झाली.
माजी दिवंगत संचालक देवकिसन चांडक, भावसिंग पाटील, आनंदा पाटील, नामदेव पाटील, सोनाजी, बळीराम पाटील, श्रीराम गावंडे यांचेसह दिवंगत झालेले माजी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. या विद्यालयाचे १९६७ च्या तुकडीचे प्रथम विद्यार्थी शिवराम काकडे यांचा तर आपल्या आई स्वर्गीय चंपाबाई गाडगे यांचे स्मृतीप्रित्यर्थ शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांच्या सोईसाठी स्वखर्चाने गट्टू बसवून देण्याचे कार्य करणारे माजी विद्यार्थी तथा सरपंच बबन तुलाराम गाडगे यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून देशभर पसरलेल्या संभाजीराजे परिवाराचे माजी विद्यार्थी आपणास एकाच कुटुंबातील सदस्य समजावे व अडीअडचणीच्या काळात एकमेकास सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, यासाठी पुन्हा नव्याने ओळखीस उजाळा मिळावा, म्हणून मेळाव्याचे प्रयोजन केल्याचे सांगीतले. प्रास्तावीक महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र बरडे यांनी केले. माजी विद्यार्थी तथा माजी आमदार धृपतराव सावळे यांनी आपल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत संभाजी राजे विद्यालयाचे योगदानाबाबत माहिती दिली.
याप्रसंगी माजी विद्यार्थी उपजिल्हाधिकारी सिध्दार्थ भंडारे, अभिता लँड सोलूशनचे सुनिल शेळके, समाजकल्याण उपायुक्त अनिता राठोड, मोटार वाहन उपनिरीक्षक आशा गवई, रा. स्व. संघाचे चित्तूंजन राठी, प्रा. दशरथ सावळे, माजी मुख्याध्यापक रामराव शेळके यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी माजी विद्याार्थी असलेले जिल्हा कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे, कार्यकारी अभियंता बी.एफ.मोरे, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. भरत लहाने, संदीप शेळके, गणेश बाहेकर, श्रीकृष्ण जेडुघाले उदयोग क्षेत्रातील बाळू जेडुघाल,े देवचंद शिंगणे, दिपक महाराज सावळे, शाहीर प्रेमसिंग कांबळे, रामचंद सोळंके, विक्रीकर निरीक्षक निलेश सावळे यांचेसह अनेक गणमान्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. तर माजी मुख्याध्यापक रामचंद कानोडजे, दिनकर पालवे, वासुदेव बोरे, पर्यवेक्षक नरसिंग देशमुख, काशीराम बोरे, वामन गुजर, नारायण शेळके, विठोबा कलाल, मधुकर इंगोले उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक संचालक प्रल्हाद पाटील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजय सावळे उपस्थित होते. तसेच श्रीराम पाटील, शेषराव आनंदा पाटील, श्याम प्रल्हाद सावळे, श्रीकृष्ण सावळे, जगन्नाथ गावंडे, नितीन जेडुघाले, किशोर चांडक, रूपराव सावळे, इंदिरा सावळे, सूत्र संचालन जगदीशचंद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दलितमित्र शेषराव सावळे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ, शिक्षक व कर्मचारी तसेच स्वयंसेवक म्हणून काम करणार्या विद्यार्थ्यांनी मागील अनेक दिवसांपासून प्रचंड परिश्रम घेतले. सर्वसामान्यसह उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या अनेक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी पुन्हा एकदा आपला वर्ग व वर्गातील सगळयात मागील मोडक्या बाकावर बसून शालेय जीवनाचा काही तासांसाठी का होईना आनंद घेतला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनानंतर व वर्गमित्रांचे स्नेहभेटीनंतर मेळाव्याची सांगता झाली.