चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली ते साकेगाव रस्त्यावर महिना होतो की ना होतो तोच कुणाला तरी आपला जीव या रस्त्यावर गमवावा लागतो. या रस्त्याचे उद्घाटन होऊन ३ महिण्याच्यावर झाले आहे तरीसुद्धा रस्त्याचे काम होताना दिसत नाही. रोडचे खड्डे बुजवले आहे तेही नित्कृष्ट दर्जाचे आहेत, तर काही ठिकाणी तर खड्ड्यामध्ये मुरूम टाकलेला दिसत नाही. त्यामुळे बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
संबंधित ठेकेदाराने थोडेफार थातूरमातूर खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. पणदेखील निकृष्ट झालेले आहे. एक महिना किंवा फार तर पंधरा दिवसाच्या कालावधीत सतत गंभीर अपघात होऊन लोकांचे जागीच मृत्यू होतात तर काही महिलांचे चिखलीला डिलिव्हरीसाठी नेत असताना गाडीतच डिलिव्हरी होतात. गाड्या चालकांना गाड्या सोडून पायदळ चालत लवकर तालुक्याच्या ठिकाणी पोहचू अशी परिस्थिती असताना बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्षपणामुळे अनेक युवकांचे जीव जात आहेत. छोटे मोठे वाहन चालकांचा रस्त्याच्या कामाचा तीव्र संताप होत आहे. नुकताच या रस्त्यावर दोन युवकांचा बळी गेल्याने या भागात संतापाची लाट आहे.
स्थानिक प्रतिनिधी यांच्याहस्ते उद्घाटन झालेले आहे तरी त्यांनी लक्ष घालून कामाला गती प्राप्त करून द्यावी, येणार्या काही दिवसांमध्ये दर्गा सैलानी येथील मोठी यात्रा भरते त्यावेळेस हा रस्ता खूप रहदारीचा होतो. तेव्हा हा रस्ता तातडीने होण्याची गरज आहे.
——————