चिखली (तालुका प्रतिनिधी) – पत्रकार हा एक असा व्यक्ती असतो जो समाजात घडत असलेल्या वेगवेगळया घटना, प्रसंगांविषयी, भ्रष्टाचाराविषयी वेगवेगळया माध्यमांचा आधार घेऊन माहिती गोळा करत असतो आणि समाजातील लोकांपर्यत ती पोहोचविण्याचे काम करत असतो. त्यामुळेच पत्रकाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या प्रशासनापुढे येत असल्याने अनेकांना न्याय मिळत आहे. असेच काम पत्रकार प्रताप मोरे हे काम करीत आहेत, असे मार्गदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलताना केले.
अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पत्रकार प्रताप मोरे यांची आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार संघटना, बँक कर्मचारी, शिक्षक मंडळी, पोलीस अधिकारी, मित्र मंडळी तथा विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला. आरोग्य विभागामार्फत या सत्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी डॉ.सांगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले की, पत्रकार प्रताप मोरे हे प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सदसदविवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, आणि बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत. ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वृत्तपत्राचे नावे ‘मूकनायक’ ठेवून गोरगरीब जनतेला न्याय दिला, त्याप्रमाणे आपल्या चिखली तालुक्यात जनतेला न्याय देण्याचे काम प्रताप मोरे हे करीत आहेत, असे भावपूर्ण उदगार डॉ. सांगळे यांनी उपस्थितांसमोर काढले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, डॉ. राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिंगे, डॉ. पाठरे, आरोग्य सुपरवायझर गवई, कुटे, काकडे, कस्तुरे, पटेल, बळी, सेविका खिल्लारे मॅडम, पर्हाड मॅडम, वायाळ मॅडम, पंडित मॅडम, वाकोडे मॅडम, इंगळे मॅडम, टेकाळे मॅडम, तथा कैलास मोरे व सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यसेवक डॉ.काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य सुपरवायझर गवई यांनी मानले.