सोलापूर (संदीप येरवडे) – एकीकडे राज्यातील अनेक जिल्हा परिषद ऑनलाईन होत आहेत. कोणत्याही जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी हे लगेच ऑनलाइन वेबसाईट ओपन केले की समजते. परंतु सोलापूर जिल्हा परिषदेची वेबसाईट अपडेट नसल्यामुळे कोणत्या विभागाला कोणता अधिकारी आहे हेच समजत नाही. विशेष म्हणजे, एकच अधिकार्याकडे दोन-तीन विभागाचा पदभार आहे. जिल्हा परिषदेमधील इशाधीन शेळकंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, स्वच्छ भारत अभियान व मुख्य कार्यकारी अधिकारी असे तीन विभागाचा पदभार देण्यात आला आहे.
याबरोबरच जिल्हा आरोग्य विभागाचा भारदेखील प्रभारीवरच आहे. बांधकाम विभाग एकदेखील गेल्या अनेक दिवसापासून प्रभारी अधिकार्यांवरच काम सुरू होते. परंतु नुकतेच खराडे हे अधिकारी रुजू झाले आहेत. प्रभारी अधिकार्यामुळे जिल्हा परिषदेची वेबसाईट ही ऑफलाइन दिसत आहे. कोणता अधिकारी कोणत्या विभागाचा विभाग प्रमुख आहे हेच समजत नाही. शिवाय त्यांचा फोटो देखील ऑनलाइन अपडेट करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन होत असल्या तरी सोलापूर झेडपीचे कामकाज मात्र ऑफलाइन दिसत आहे.
सध्या सोलापूर जिल्हा परिषद वेबसाईटर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, महिला व बालकल्याण अधिकारी जे. एन. शेख, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दीपक कोळी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर या अधिकार्यांचा फोटो ऑनलाईन झेडपीच्या साईटवर दिसतो. सध्या पदाधिकारी जरी नसले तरी कोणत्या विभागाचा अधिकारी विभाग प्रमुख आहे हे ऑनलाइन अपडेट करण्यात आले नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. उर्वरित जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, आरोग्य विभाग, कृषी विभाग, जलसंधारण विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी कोणता अधिकारी आहे आणि त्यांचा फोटो देखील अपलोड करण्यात आला नाही.
शेळकंदेवर पदाचे ओझे!
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्याकडे जवळपास तीन पदभार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्या पदाला न्याय मिळणार आणि कोणत्या नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासन अधिकारी आणि स्वच्छ भारत असे महत्त्वाचे विभाग आहेत.
——————